Saturday, July 25, 2026
spot_img
Home Satara District भाजप आ श्री छ शिवेंद्रराजे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित दादांची भेट

भाजप आ श्री छ शिवेंद्रराजे यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित दादांची भेट

193
Adv

भाजपचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज पुणे येथे राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित दादा पवार यांची भेट घेतल्याने भल्या भल्यांच्या भुवया उंच झाल्या आहेत मात्र ही भेट सातारा जावली मतदारसंघातील विविध विकासकामांच्या संदर्भात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

साताऱ्याचे भाजपचे आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयात शिवेंद्रराजे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट झाली. या बैठकीत जवळपास तासभर चर्चा झाली. आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे अचानक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. यापूर्वीही आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांनी अशाच प्रकारे अजित पवारांची भेट घेतली होती.तासाभरापासून शिवेंद्रराजे आणि अजित पवार यांच्यात बैठक सुरू होती. या बैठकीत विविध राजकीय विषयांवर चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान ही भेट वैयक्तिक व विकास कामांसाठी असल्याचं आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं. आहे.

Adv