Wednesday, August 19, 2026
spot_img
Home Satara District Satara Taluka कोणतेही अधिकृत पद नसलेल्या व्यक्तीला बैठकीत बसण्याची परवानगी कोणी दिली?

कोणतेही अधिकृत पद नसलेल्या व्यक्तीला बैठकीत बसण्याची परवानगी कोणी दिली?

784
Adv

सातारा पंचायत समिती येथे जिल्हा परिषद सदस्य कामेश कांबळे यांच्या उपस्थितीत पंचायत समितीचे सभापती महेश गाडे व संबंधित अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. बैठकीत खेड जिल्हा परिषद गट, खेड पंचायत समिती गण आणि क्षेत्र माहुली पंचायत समिती गणातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे, स्थानिक समस्या आणि त्यांच्या निराकरणाबाबत चर्चा झाली.
मात्र, बैठकीतील चर्चेपेक्षा एका वेगळ्याच बाबीची अधिक चर्चा रंगली. कोणतेही शासकीय पद किंवा अधिकृत जबाबदारी नसल्याचे सांगितल्या जाणाऱ्या बाळासाहेब खरात यांची बैठकीतील उपस्थिती अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरली. बैठकीत ते अधिकाऱ्यांशी संवाद साधत असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली.
सूत्रांच्या माहितीनुसार, या उपस्थितीमुळे काही अधिकारीही आश्चर्यचकित झाल्याचे बोलले जात आहे. यानंतर प्रशासकीय बैठकीत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश कशाच्या आधारावर दिला जातो, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सातारानामाचा सवाल…
शासकीय आढावा बैठकीत उपस्थित राहण्याचा अधिकार नेमका कोणाला?
कोणतेही अधिकृत पद नसलेल्या व्यक्तीला बैठकीत बसण्याची परवानगी कोणी दिली?
अधिकाऱ्यांवर अशा व्यक्तींचा दबाव निर्माण होण्याची शक्यता प्रशासन नाकारू शकते का?
या प्रकरणाची चौकशी करून प्रशासन भूमिका स्पष्ट करणार का?

सदर आढावा बैठक चार दिवसापूर्वी झाली असल्याचे समजते

Adv