Sunday, September 6, 2026
spot_img
Home Satara District Satara Taluka भरतगाववाडी येथील नूतन मिरवणूक रथास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा...

भरतगाववाडी येथील नूतन मिरवणूक रथास खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भे;

34
Adv

नागठाणे :- गावचे स्वयंभू देवस्थान व ग्रामदैवत श्री गणेशाच्या कृपेने पावन झालेल्या भरतगाववाडी येथील आगामी होऊ घातलेल्या श्री गजानन भंडारा उत्सवासाठी सर्व ग्रामस्थ आणि तरुण वर्गाच्या पुढाकाराने कातर खटाव येथे तयार करण्यासाठी देण्यात आलेल्या नूतन देखण्या रथास सातारा लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी रथाची सखोल पाहणी करून त्यांनी उपस्थितांशी आस्थेवाईकपणे संवाद साधला. या सदिच्छा भेट प्रसंगी गावचे सुपुत्र, लोकसभा संयोजक तथा सातारा जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व अर्थ सभापती सुनील काटकर, मा. काका धुमाळ, डॉ. महेशराव गुरव, हिम्मतराव माने, युवा उद्योजक तेजस जगताप, अमित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. ग्रामदैवत श्री गणेशाच्या आशीर्वादाने भरतगाववाडी गावाला मोठी धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. गावात दरवर्षीप्रमाणे यंदाही २३५ व्या वर्षी “एक गाव एक गणपती” हा स्तुत्य उपक्रम राबवला जात असल्याबद्दल खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या ऐतिहासिक व कौतुकास्पद उपक्रमाचे विशेष कौतुक करून मोठ्या उत्साहात स्वागत केले. त्यांनी ग्रामीण भागातील ही एकजूट संपूर्ण महाराष्ट्रासाठी आदर्श असल्याचे नमूद केले. गावातील आगामी श्री गजानन भंडारा उत्सव अत्यंत अभूतपूर्व, देखणा आणि भव्य-दिव्य करण्यासाठी सर्व स्तरातील ग्रामस्थांनी व तरुणांनी एकत्र येत, एकीचे बळ दाखवत कातर खटाव येथे एका वैशिष्ट्यपूर्ण आणि आकर्षक नूतन मिरवणूक रथाची निर्मिती करून घेतली आहे. या रथाची निर्मिती अंतिम टप्प्यात असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी रथाला भेट देऊन रथाचे आणि भरतगाववाडी ग्रामस्थांच्या या सामूहिक उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. त्यांनी रथाच्या आकर्षक सुशोभिकरणाची, त्यावर कोरण्यात आलेल्या कलाकुसरीची आणि उत्कृष्ट कारागिरीची अतिशय बारकाईने पाहणी केली. या प्रसंगी दिवस-रात्र मेहनत घेऊन रथाची सुंदर व देखणी निर्मिती करणाऱ्या मुख्य कारागिरांचा खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले यांनी भरतगाववाडीच्या एकीचे आणि सांस्कृतिक परंपरा जपण्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले. “ग्रामीण भागातील अशा धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांमुळे समाजात एकोपा वाढतो आणि पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीची गोडी लागते, भरतगाववाडीने दाखवलेली ही २३५ वर्षांची ‘एक गाव एक गणपती’ची परंपरा संपूर्ण तालुक्यासाठी अभिमानास्पद आहे” अशा भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. त्यांनी गावाच्या उत्सवासाठी आणि विकासासाठी आपले नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाहीही यावेळी दिली. या वेळी तरुण मंडळाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ भरतगाववाडी उपस्थित होते….!

[चौकट]
*रथाच्या कुशल कारागिरांचा गौरव*
नूतन रथाची निर्मिती अंतिम टप्प्यात असताना रथाचे कुशल कारागीर सचिन भांडवलकर, नितीन भांडवलकर आणि आकाश सुतार यांचा खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी खा. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या या अत्यंत सुंदर व दर्जेदार कुशल कामाचे भरभरून कौतुक केले आणि तिन्ही कारागिरांना त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या….!

Adv