स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीनंतर शहरासाठीचे अपूर्ण विकास प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काही नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना दिल्या. असल्याचे समजते दरम्यान पालिका निवडणुका एक वर्षावर येऊन ठेपल्याने पालिकेतील सत्ताधारी सातारा विकास आघाडी पुन्हा सक्रिय झाली आहे. मात्र नगरसेवकांनी चार वर्षात एखादे ठोस व उठावदार काम केले आहे का याचे प्रगति पुस्तक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तपासणार का हा खरा प्रश्न आता उभा राहिला आहे
सातारा पालिकेच्या डिसेंबर 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत सातारकरांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सातारा विकास आघाडीला बहुमत दिले. दहा वर्षाच्या मनोमिलनाला छेद देउन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या नेतृत्वाखाली सातारा विकास आघाडी स्वतंत्रपणे लढून 22 जागांवर विजयी झाली. ही निवडणूक उदयनराजे यांनी राजकीयदृष्टया प्रतिष्ठेची करुन आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे यांच्या पत्नी श्रीमंत छत्रपती वेदांतिकाराजे भोसले यांच्या विरोधात राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या माधवी कदम यांना नगराध्यक्षपदी निवडून आणले. मात्र खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्यावर असलेला सातारकरांचा विश्वास आजही तो कायम आहे यात तिळमात्र शंका नाही मात्र ज्या अपेक्षेने लोकांनी नगरसेवकांना निवडून दिले त्यांचा भ्रमनिरास झाला असल्याचे चित्र सध्या दिसून येते त्याला कारण आहे की शहरात पालिकेच्या वतीने एकही न झालेले ठोस काम
ग्रेड सेपरेटरचे श्रेय फक्त उदयनराजेंनाच
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भविष्याचा विचार करून तत्कालीन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे साताऱ्याचा वाहतुकीचा प्रश्न मिटण्यासाठी साताऱ्यात ग्रेड सेपरेटर व्हावा यासाठी प्रयत्न केले होते त्याला यशही आले ग्रेड सेपरेटर जवळपास आता पूर्णत्वाकडे आला आहे याचे श्रेय फक्त आणि फक्त खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे असल्याचे सातारकर म्हणत आहेत
जुन्या नगरसेवकांच्या कामांची रेघ नव्या नगरसेवकांनी पुढे ओढली
मागच्या नगरसेवकांची काही मंजूर कामे, उदा़ प्रभागातील रस्ते, चेनलींग जाळ्या, सदर बाजार मधील पूल, व इतर प्रभागांमधील इतर कामे व पूल, बंदिस्त गटारे, ही कामे मागील नगरसेवकांनीच मंजूर केली होती मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सदरची कामे दुर्दैवाने करता आली नाहीत याची यादी ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे या नूतन नगरसेवकानी निवडून आल्यावर जुन्या कामांची रीग पुढे ओढल्याचे दिसते त्यामुळे राजे 22 नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक तपासून ठोस काम बघाच
पालिकेत घडलेली लाच लुचपत विभागाची कारवाई डोकेदुखी ठरणार?
ऐतिहासिक सातारा पालिकेत सुमारे दीडशे वर्षात दुर्दैवाने कधीही न घडलेली घटना सातारा पालिकेत गेल्या सहा महिन्यांपूर्वी घडली तीन आरोग्य निरीक्षक व एक उपमुख्य अधिकारी यांना लाचलुचपत विभागाने पकडून नेले याला जबाबदार कोण असा प्रश्नही सातारकरांना अजून पडलेलाच आहे जर अधिकाऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचा वचक नसेल तर निवडून दिलेल्या सत्तेचा काय उपयोग असेही सातारकर म्हणत आहेत त्यामुळे राजे खरोखरच नगरसेवकांचे प्रगतीपुस्तक तपासून योग्य ते आपण मार्क द्या कोण पास आणि कोण नापास हे पण तुम्हाला त्या वेळेस कळेल अशी सातारकर जनतेची अपेक्षा आहे