श्री छ उदयनराजेंना बिनडोक म्हटलेलं सहन करणार नाही’- गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

122
Adv

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी खासदार श्रीमंत  छत्रपती उदयनराजे भोसले आणि संभाजी राजे भोसले यांच्यावर टीका केली. उदयनराजे आणि संभाजी राजे यांचा नामोल्लेख टाळत ”एक राजा तर बिनडोक तर दुसऱ्यांचा आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवरच भर”, असं आंबेडकर म्हणाले आहेत. प्रकाश आंबेडकर यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. प्रकाश आंबडेकर यांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवत राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

”छत्रपती घराण्याचे वंशज श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बद्दल प्रकाश आंबेडकर यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे. संपूर्ण राज्यात छत्रपतींच्या गादीला मानणारे लोक आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील जनता छत्रपतींच्या घराण्याला त्यांच्या गादीला वंदन करत आली आहे. त्यामुळं सातारच्या गादीचा अवमान खपवला जाणार नाही. त्याच्यावरील टीका कदापि सहन केली जाणार नाही”, असं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.
”दोन्हीही छत्रपतींनी, सातारा आणि कोल्हापूरच्या गादीच्या प्रतिनिधींनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असं असताना प्रकाश आंबेडकरांसारख्या मोठ्या माणसाने छत्रपतींच्या वंशजांवर टीका करणं गैर आहे चुकीचं आहे. आम्ही सातारकर म्हणून आणि छत्रपतींना मानणारे मावळे म्हणुन छत्रपतींच्या वंशजांवर केलेली टीका कदापि सहन करणार नसल्याचे” देसाई यांनी ठणकावून सांगितले.

Adv