“परख्यानाही आपलस करतील, असे काही गोड शब्द असतात, शब्दांनाही कोडे पडावे, अशी काही गोड माणसे असतात, किती मोठ भाग्य असत जेव्हा ती आपली असतात.”
असे अखंड स्मरणात राहणारे, सातारा पालिकेचे विविध पदाधिकारी, सदस्य, सदस्या, अधिकारी, कर्मचारी व मित्र परिवार यांच्याशी जिव्हाळ्याचे संबध असणारे सातारा पालिकेची विवेकी अर्थवाहिनी म्हणजेच विवेक जाधव सेवानिवृत्त लेखापाल रविवार, दिनांक ३१/०५/२०२० रोजी प्रदीर्घ सेवेतून नियत वयोमानानुसार सेवा निवृत्त झाले असल्याने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन…!
इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे “सेवानिवृत्तीचा” कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात, पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते, आयुष्याची दुसरी इनिंग सुरु झाली, पण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात, ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते, म्हणूनच मनावर दगड ठेवून या दिवशी आपण आनंद तर साजरा करतो, पण या दिवशी दु:खही तेवढेच होत असते, आमचे सातारा पालिकेचे माजी लेखापाल विवेक जाधव त्यांनी आपल्या कार्यकाळात नगराध्यक्ष यांचे स्वीय सहाय्यक अंतर्गत लेखा परीक्षक लेखापाल असे उत्कृष्ट काम करून सातारा पालिकेला आर्थिक शिस्त लावण्याचा प्रयत्न केला सातारा येथे नोकरीच्या काळामध्ये वरील ठीक ठिकाणी काम केले, हा त्यांच्या आयुष्यातील प्रामाणिकपणाचा बहुमान असेल.
माजी लेखपाल विवेक जाधव यांना आपल्या कार्यकाळात बहुमूल्य मदत झाली ती माजी नगराध्यक्ष रामभाऊ घोरपडे यांची
आपण सेवानिवृत्त होताय,
हे अगदी खरं…पण आपल्याशी असलेलं आमचं नात मात्र…सदैव अबाधितच राहील…तुमच्या सहवासात घालवलेलेअनेक क्षण आजही आम्हाला आठवतात…तुमचा स्वभाव, तुमचं वागणं,आम्हाला सतत आठवतच राहील…तुमचं इथून पुढचआयुष्यहीअसंच…सुखसमाधानाच जावो याच आमच्या शुभेच्छा