लॉकडाउनमुळे सगळे व्यवहार ठप्प झाले असताना दुकाने, हॉटेल बंद झाली. मात्र या काळात गेल्या 86 वर्षांपासून सुरू असलेली वाठार स्टेशन येथील दुर्गा खानावळ मात्र अखंडपणे लोकांची भूक भागवत आपल्या कामाचा ठसा उमटवला. त्यांनी या काळात कोरोनाविरोधात लढणारे शासकीय कर्मचारी आणि अनाथ लोकांसाठी खानावळ सुरू ठेवली. एक आगळी-वेगळी परंपरा जिल्ह्याला घालून दिली
दुर्गा खानावळ चे मालक वारकरी संप्रदायातील विक्रम जाधव सध्या खानावळ चालवत आहेत. लॉकडाउनच्या काळात एवढ्या वर्षांचा वसा हा बंद होणार काय?अशी भीती निर्माण झाली होती. मात्र, वाठार स्टेशन भागातील शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी खानावळ सुरू ठेवली. त्यांना खानावळीतून दररोज जेवण पोच केले जात होते तसेच स्टेशन परिसरातील अनाथ व्यक्तींनाही त्यांनी जेवण सुरू ठेवले आहे.
देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणाऱ्या या खानावळीच्या संस्थापक सोनाबाई जाधव यांचा देशभक्तीचा वसा त्यांचे पणतू विक्रम वसंतराव जाधव यांनीही कोरोनाच्या काळातही जपला. असून त्यांच्या या कार्याचे जिल्हा वासियांनी भरभरून कौतुक केले आहे