“दोन तासांच्या किर्तनात एखादं वाक्य चुकीचं जाऊ शकतं. मात्र मी जे बोललो, ते चुकीचं नाहीच. मी बोललेलं अनेक ग्रंथात नमूद आहे. वादामुळे मला खूप त्रास होत आहे. एक दोन दिवस बघेन आणि किर्तन सोडून शेती करेन” असं इंदुरीकर म्हणाले आहेत. “यूट्यूबवाले काड्या करतात.
कोणताही कीर्तनकार, प्रबोधनकर आपल्या प्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला एक दिशा देत असतो. मात्र इंदुरीकर महाराज आपल्या प्रबोधनातून महिला मुलींवर उपहासात्मक आणि अपमानास्पद टीका करत असतात. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा आहे. या परंपरेतून त्यांनी चांगले विचार समाजात रुजवायला पाहिजेत. मात्र प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांनी संतांचा विचार मांडला पाहिजे.’
तसेच इंदुरीकरांनी आपल्या कीर्तनातून स्त्री – जन्माचा विचार समाजात रुजवायला पाहिजे. त्याचबरोबर पुरुषांमध्ये हि स्त्रियांचा सन्मान आणि आदर राखण्याचा विचार मांडायला हवा. स्त्री जन्माची धुरा त्यांनी समाजात रुजवणे गरजेचे आहे. मात्र त्यांच्यावर टीका झाली म्हणून त्यांनी कीर्तन सोडण्याची गरज नाही, असेही राष्ट्रवादीच्या नेत्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी यावेळी सांगितले आहे.