अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या ३६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ .

75
Adv

सहकारी साखर कारखानदारीमध्ये मैलाचा दगड ठरलेल्या अजिंक्यतारा साखर कारखान्याने नेहमीच सभासद शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून नियोजनबध्द कामकाज केले आहे. अनेक अडचणींवर मात करुन कारखाना आज आर्थिकदृष्ट्‌या पुर्णपणे सक्षम असून कारखान्याची घोडदौड जोमाने सुरु आहे. ऊस पुरवठादार सभासद शेतकर्‍यांनी कारखान्याला गाळपासाठी पाठवलेल्या ऊसाला उच्चतम दर देण्यात कारखाना नेहमीच अग‘ेसर राहिला असून याही गळीत हंगामात येणार्‍या ऊसाला किङ्गायतशीर दर देण्याची परंपरा कारखाना अखंडीत ठेवेल, असा विश्‍वास श्रीमंत छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले यांनी व्यक्त केला.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी गळीत हंगामाचा शुभारंभ ज्येष्ठ सभासदांच्या शुभहस्ते संपन्न झाला. ही परंपरा कारखान्याने कायम ठेवली. ही अभिमानाची बाब आहे. कमी ऊसाच्या उपलब्धतेमुळे यंदाचा गळीत हंगाम हा जिकरीचा असून कारखान्याने ठरविलेले ५.०० लाख मे.टन उद्दिष्ट यशस्वीपणे पुर्ण होणेसाठी कारखान्याने आवश्यक ते नियोजन केले आहे.

आवश्यक तेवढी ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा करारबध्द करून हजर झालेली आहे. एकंदरीत हा हंगाम कमी दिवसाचा राहणार असल्यामुळे कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी कारखान्याने तसे नियोजन केले आहे. हंगामासाठी ऊस उत्पादकांनी कारखान्याकडे गाळपासाठी नोंदविलेला सर्वच्या सर्व ऊस गाळपास देऊन गळीत हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन सौ. वेदांतिकाराजे यांनी यावेळी केले. यंदा भरपूर प्रमाणात पाऊस झाल्यामुळे लागवड वाढविण्यास मोठा वाव आहे. तेव्हा लागवडीचे क्षेत्रामध्ये वाढ होणेसाठी प्रत्येक ऊस उत्पादकांनी तसे नियोजन करून पुढील वर्षी आपल्या कारखान्यास जास्तीत जास्त गाळपास ऊस कसा उपलब्ध होईल यासाठी आवश्यकते प्रयत्न करावेत. अजिंक्यतारा कारखाना ही मातृसंस्था असून ती चांगली चालणेसाठी आतापर्यंत सर्वांनी सहकार्य केले असून असेच सहकार्य यापुढेही वृध्दींगत व्हावे, असे सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या.

Adv