कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री टोपे साहेब जिल्ह्यातील रेमडेसीविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबवा?

49
Adv

सातारा जिल्ह्यात कोरोणाची संख्या ही वाढतच चालल्याने बेड, ऑक्सिजनसह रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा भासत असल्याने जिल्ह्यातील रुग्णांचे अतोनात हाल होत असल्याचे दिसून येते जिल्हा रुग्णालयवर जिल्ह्यातील नागरिक पूर्ण नाराज असून याप्रकरणी आता आपणच लक्ष घालून नक्की काळाबाजार इंजेक्शनचा कोण करते याचा शोध घ्यावा अशी अपेक्षा नागरिकांनी करत आहेत

राजेश टोपे साहेब कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र आपल्याकडं पाहत आहे हाच सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणूनही संबोधला जातो याच बालेकिल्ल्यात जिल्हा रुग्णालय असेल व इतर पातळीवर कोरोनाच्या बाबतीत शुनय नियोजन काम असे दिसून येते जिल्हा रुग्णालयात गेले तर सिव्हिल सर्जन हे जागेवर नसल्याच्या तक्रारीही बऱ्याच आहेत जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शन वेळेत मिळत नसल्यामुळे अनेकांना मृत्यूला कवटाळावे लागले आहे सिव्हीलमध्येच या रेमडेसिवीरचा गफला झाल्याचा आरोप झाला. पुढे जिल्हा प्रशासन, मंत्री यांनी चौकशीचे आदेश दिले पण आजही त्यावर कोणती कारवाई केली गेली नाही त्यामुळे कर्तव्यदक्ष आरोग्यमंत्री म्हणून आपण काळाबाजार झालेल्या इंजेक्शनची ची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व जिल्ह्याला इंजेक्शन कसे तातडीने मिळतील याचे नियोजन करावे अशी अपेक्षाही जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली आहे

खरे जम्बो कोविड सेंटर हे कोरेगावलाच

कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी स्वखर्चाने सुमारे तीनशे बेडचे कोविड सेंटर उभे केले स्वतः महेश शिंदे हे शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्याच पक्षाचे मुख्यमंत्री देखील आहेत मात्र प्रशासनाच्या विश्वासावर न राहता त्यांनी सुमारे सहा महिन्यांसाठी कोरेगावात तीनशे बेडचे ऑक्सीजन पूर्ण स्टाफ सह जम्बो covid सेंटर उभे केले आहे स्वखर्चाने covid जम्बो सेंटर उभे करणारे आमदार महेश शिंदे हे जिल्ह्यातील एकमेव आमदार ठरले आहेत

रोज सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या जवळपास 700 ते 900 च्या घरात आहे म अडीशे चे कोविड सेंटर कसे काय पुरणार ? हा खरा प्रश्‍न उभा राहिला आहे याच कोवीड सेंटरची संख्या वाढवली तर सातारा जिल्ह्याचा बराचा प्रश्न मिटण्या सारखा असल्याने या बाबतीत आपण लक्ष द्यावे अशी मागणी जिल्ह्यातील नागरिकांनी केली आहे

Adv