कर्तव्यदक्ष नगरसेवक अमोल मोहिते यांची अशीही सहृदयता कोविड पेशंटसाठी केले प्लाझ्मादान

93
Adv

कोविड संक्रमणाच्या काळात मानवी संवेदना दर्शवणाऱ्या अनेक घटना समोर येत आहेत . नगर विकास आघाडीचे पक्षप्रतोद माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक अमोल मोहिते यांनी आरळे ता सातारा येथील कोविड रुग्णासाठी प्लाझ्मा दान केले प्लाझ्मा दानाची ही जिल्हयातील पहिली घटना ठरली आहे . मोहिते यांनी दाखवलेल्या माणुसकीचे सर्वत्र कौतुक होत आहे .

आरळे गावातील एका पेशंटला रक्तातील प्लाजमा ची अत्यंत गरज होती . पेशंटचा ब्लड ग्रुप दुर्मीळ असल्याने सलग दोन-तीन दिवस खुप शोधाशोध केली तरी मिळत न्हवता त्यामुळे पेशंटचे नातेवाईक हतबल झाले होते.

गावातील साई कदम या युवकाने साताऱ्यात नगरसेवक अमोल मोहिते यांना फोन करुन आपण प्लाझ्मा दान करावा अशी विनंती केली, त्यावर अमोल मोहिते यांनी कोणतेही कारण न देता सांगीतले की मी माझा प्लाजमा द्यायला तयार आहे असे सांगितले .आणि शब्द दिल्याप्रमाणे त्यानी त्या पेशंट साठी आपला प्लाजमा दिला. साताऱ्यातील एका ब्लड बँकेत ही प्लाझ्मा दानाची प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली .

नगरसेवक अमोल मोहिते जनता कर्फ्यू (22 मार्च) पासुन लोकांसाठी सक्रीय कार्य करत आहे. लोकांना धान्य पुरवठा, होमियो पेथिक औषधे, सनिटाझेशन, आरोग्य चिकित्सा शिबीर सतत लोकांमधे लोकांसाठी असे त्यांचे काम सुरू आहे .
अशात स्वतः ला करोना झाला त्यावर मात करून ते पुन्हा कामाला लागले .

लोकांसाठी रात्रंदिवस झटत आहे. पेशंटला बेड मिळवून देणे आणि ज्या पेशंटना बेड मिळत नाहीये त्या पेशंटच्या घरीच ऑक्सिजन कौन्सेन्ट्रेट मशीन स्वतः उपलब्ध करुन देणे अशा कामामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले आहे .

Adv