कास पठारवर कोरोनाच्या प्रद्रुभावामुळे पर्यटकांना बंदी असतानाही काही पर्यटक कास पठारवर येत असुन ते फुलांमध्ये विनापरवानगी प्रवेश करत असल्याने त्यांच्यावर वन समीतीने कारवाईची मोहीम हाती घेतली असुन रविवारी दोन जणांवर कारवाई करत त्यांच्याकडुन १००० रूपये दंड वसुल केला आहे.
जागतिक वारसास्थळ कास पुष्प पठार हे नैसर्गीक रंगीबेरंगी रानफुलांनी बहरले असुन काही पर्यटकांना कोरोनाच्या महामारीतही पर्यटनस्थळे बंद असतानाही नैसर्गिक फुलांचा आनंद लुटण्याचा मोह आवरेनासा झाला असुन अनेक पर्यटक कास पठारकडे धाव घेऊ लागले आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कास रोडवर वाहनांची वर्दळ वाढल्यांचे दिसुन येत असुन काही पर्यटक रोडवरूनच फुलांचा आनंद लुटत आहेत. तर काही पर्यटक कुंपन जाळी च्या खालुन फुलांच्या राखीव क्षेत्रात बेकायदेशीर प्रवेश करत आहेत.
कोरोनामुळे शासनाने पर्यटन बंदी कायम ठेवली असल्याने वनसमीतीने यावर्षीचा फुलांचा हंगाम पर्यटकांसाठी बंद ठेवल्याचे जाहीर करत पर्यटकांनी कास पठारवर येवु नये असे अवाहन करूनही सुचना फलक लावुनही अनेक पर्यटक कास पठारवर दाखल होत आहेत. व ते कुंपनाच्या आत फुलांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करत असल्याने वनविभागाच्या सुचनेनुसार वनसमीतीने कारवाईची मोहीम हाती घेतली असुन रविवारी कुंपनाच्या आत फुलांमध्ये प्रवेश करणाऱ्या दोन सातारमधील पर्यटकांवर कारवाई करत प्रत्येकी ५०० रूपये दंड वसुल केला आहे. कास पठारवर कोणीही पर्यटनासाठी येऊ नये व फुलांमध्ये बेकायदेशीर प्रवेश करू नये अन्यथा कारवाई केली जाईल, असे वन समीती कर्मचारी पदाधीकाऱ्यांनी आवाहन केले आहे.