Sunday, April 19, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City महेश शिंदेंचा फोटो शिवसेनेच्या फ्लेक्स वरून गायप

महेश शिंदेंचा फोटो शिवसेनेच्या फ्लेक्स वरून गायप

59
Adv

एक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्या अगोदर सातारा शहरात फ्लेक्स बाजीला ऊत आले असून या फ्लेक्स वरून कोरेगावचे शिवसेना आमदार महेश शिंदे व शिवसेना सातारा शहर प्रमुख निलेश मोरे यांना जाणून बुजून डावले असल्याचे स्पष्टपणे दिसून येते

भाजपच्या बालेकिल्ल्यात व मंत्री महोदय यांच्या घराच्या हाकेपासून अंतरावर असलेल्या मैदानावरच पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेचे आयोजन केले असून नक्की सभा कोरेगावचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्यासाठी कि भाजपच्या नेत्यांसाठी हे सोमवारीच स्पष्ट होणार आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्याची सुरुवात
कोरेगाव मतदारसंघातील अंगापूर या तीर्थक्षेत्राच्या भेटीने होणार आहे या गावाला दोन कोटींचा निधी देऊन पालकमंत्र्यांनी आमदार महेश शिंदे यांच्या मतदारसंघात एका नव्या पर्यायाचे संकेत दिले आहेत अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकी नंतर शिंदे आणि देसाई यांच्यातील वाढते अंतर या कृतीतून अधिक स्पष्ट झाले आहे कोरेगावातील कार्यक्रमानंतर सातारा शहराच्या मध्यवर्ती असलेल्या गांधी मैदानावर मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे ही सभा प्रामुख्याने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले
यांच्या प्रभावाला शह देण्यासाठी आयोजित करण्यात आल्याचे बोलले जात आहे

Adv