Tuesday, July 21, 2026
spot_img
Home Politics|Satara District Satara City अन्यथा पाणी बिल विसरा… बालगुडे यांचा इशारा

अन्यथा पाणी बिल विसरा… बालगुडे यांचा इशारा

125
Adv

शाहुपुरीतील पाणी प्रश्नी मा.कार्यकारी अभियंतासो यांना निवेदन देऊन चर्चा केली. या चर्चे मध्ये कण्हेर पाणी पुरवठा योजना ही शाहूपुरीवासियांसाठी तयार करण्यात आली आहे. कण्हेर पाणी पुरवठा योजना माननीय नामदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शाहूपुरीवासियांसाठी तयार केलेली असून
कडाक्याच्या उन्हाळा चालू झाला आहे. तरी शाहुपुरीतील कण्हेर पाणी पुरवठा हा कोटेश्वर पाण्याची टाकी व भैरवनाथ डोंगर येथील कास पाणी पुरवठा साठ्याची टाकी मध्ये सोडू नये. अशा पद्धतीने निवेदन देऊन सर्व प्रकारची चर्चा करण्यात आली.

शाहुपुरीतील नागरिकांना वेठीस धरून मनाला येईल तेव्हा पाणी पुरवठा बंद होत आहे. शाहुपुरीतील नागरिकांचे हक्काचे पाणी दुसरीकडे वळविले जात आहे. अगोदरच पाणी पुरवठा कमी दाबाने कमी वेळ होत आहे,वेळोवेळी ही बाब संबंधित अधिकाऱ्यांच्या कानावर देखील घालण्यात आली आहे. तरी कृपया कण्हेर पाणी पुरवठा चे पाणी दुसऱ्या भागाला वळवू नये.
कडाक्याच्या उन्हाळ्यात पाणी वाचून शाहूपुरीवासियांची गैरसोय होऊ नये व नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळावे, अन्यथा पुढिल महिन्यातील पाणी बिल शाहूपुरी नागरिक भरणार नाही,असे निवेदन देऊन चर्चा करण्यात आली.
साहेबांनी देखील सकारात्मक प्रतिसाद देऊन त्वरीत शाहूपुरी सोडून इतर भागाला होत असलेला पाणी पुरवठा बंद करण्याचा सूचना अधिकारांना दिल्या आहेत. भविष्यात कोणतेही सूचना न देता अश्या पद्धतीने आपल्या हक्काचे पाणी वळवू नये. शाहुपुरीतील नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा व्हावा. अशा सूचना मा. कार्यकारी अभियंता सो.यांचा कडून सबंधित शाहुपुरीतील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी यांना देण्यात आल्या, अशा पद्धतीने सकारात्मक चर्चा झाली व चर्चेला यश मिळाले.

Adv