सातारकरांची शान असलेली चौपाटी याचे काम भाजपच्या नगरसेविका यांच्या प्रयत्नाने मंजूर झाला असून ते तातडीने सुरूही झाले आहे पंचवीस वर्ष न झालेला व रखडलेला रस्ता गटनेत्या नगरसेविका सौ सिद्धी पवार यांच्या प्रयत्नातून व प्रशासनाच्या मदतीने आज सुरू करण्यात आला. याप्रसंगी याठिकाणी नागरिकही उपस्थित होते. सिद्धी पवार यांच्या माध्यमातून होत असलेल्या सर्वच कामांबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
येऊ घातलेल्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर किमान रस्ता येण्या जाण्या योग्य असावा याकरिता तातडीने निर्णय घेऊन गटनेत्या नगरसेविका सिद्धी पवार व प्रशासन यांनी कोल्हटकर आळी येथील रस्ता डांबरीकरण सुरुवात केली आहे. तसेच या कामाबरोबर राजवाडा चौपाटी याठिकाणीही गटनेत्या नगरसेविका सौ सिद्धी पवार यांच्या माध्यमातून डांबरीकरण करण्यात येणार आहे.
चौपाटीचे गाडे नसताना लवकरात लवकर डांबरीकरण करून घेणे करता नगरसेविका सौ सिद्धी पवार प्रयत्नशील असल्यामुळे चौपाटी चालू होण्यापूर्वी व पाऊस सुरू होण्यापूर्वी येथील चौपाटीचा संबंध भाग जो कित्येक वर्ष दुरावस्थेत व दुर्लक्षित होता त्याचे डांबरीकरण करून घेतले जाणार आहे अशी माहिती गटनेत्या व नगरसेविका सौ सिद्धी पवार यांनी दिली आहे