येत्या १० जून रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २२ व्या वर्षात पदार्पण करत असून याच निमित्ताने प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानाची सुरुवात प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी काल शुक्रवार दिनांक २२ मे रोजी सायंकाळी ४ वा.केली.
त्याचप्रमाणे हे अभियान सातारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात यावे या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील पदाधिकारी यांना सूचना करून जिल्ह्यातील अभियानाची सुरुवात *राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.बाळासाहेब पाटील* यांनी केली.
यावेळी, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील, सचिन बेलागडे, दीपक साहेबराव पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सेवादलाचे संघटक राजेंद्र लावंघरे, अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष शाफिक शेख, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी अध्यक्षा समिंद्राताई जाधव, कार्याध्यक्षा जयश्रीताई पाटील, महिला आघाडी सरचिटणीस नलिनीताई जाधव, भरत देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी २२ व्या वर्षात १० जूनला पदार्पण करते आहे. याचे औचित्य साधून प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री ना. जयंत पाटील यांनी ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानाची घोषणा केली आहे. या अभियानांतर्गत राज्यभरातील जवळपास ५ लाख पदाधिकाऱ्यांशी फोनद्वारे संवाद साधला जाणार आहे.राज्यात महाविकासआघाडी सरकार येऊन जवळपास ६ महिने पूर्ण झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडी सरकारचा प्रमुख घटक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कोरोनाच्या या संकटकाळात तळागाळातील लोकांपर्यंत मदत पोहचवण्याचे काम करत आहेत. काही दिवसांनी कोरोनाचे संकट संपेल, तसेच राज्य पूर्वपदावर येईल. तेव्हा काही समस्या उद्भवतील. या समस्यांचे निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पुन्हा जोमाने कामाला लागतील. लोकांपर्यंत मदत पोहचवताना कार्यकर्त्यांना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, मनोगत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‘राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय’ या अभियानांतर्गत जाणून घेणार आहेत.
या अभियानाची इत्यंभूत माहिती पक्षश्रेष्ठींकडे पोहचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. शुक्रवार, २२ मे २०२० रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून हे अभियान सुरू केले आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी तसेच बूथ कमिटी अध्यक्ष व सदस्य ,स्थानिक स्वराज्य संस्थाचे पदाधिकारी व सदस्य, तालुकाध्यक्ष यांच्याशी ते संवाद साधणार आहेत, असे ही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने व जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी सांगितले.