करोनाची सुरुवात झाल्यानंतर सातारा शहरात खरे काम केले ते घोरपडे पती-पत्नीने करोणाची सुरुवात झाल्यानंतर भलेभले पदाधिकारी घरी बसले ते अजून पर्यंत पालिकेत उगवलेले दिसत नाहीत मात्र खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेली जबाबदारी गेल्या अडीच महिन्यांपासून अनिता घोरपडे व त्यांचे पती अशोक घोरपडे यांनी सार्थ ठरवल्याचे दिसून येते अशोक घोरपडे यांनी त्यांच्या संपर्कातून पालिकेला मास्क, सँनी टायझर व विविध साहित्य उपलब्ध करून दिले आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी सुद्धा आपल्या पालिकेतील कर्मचाऱ्यांचे आरोग्य शिबिर घेऊन कर्मचाऱ्यांची मने जिंकली
देशभरात करोणा चा हाहाकार माजू लागला मात्र सातारा पालिकेच्या आरोग्य सभापती अनिता घोरपडे व त्यांचे पती अशोक घोरपडे यांनी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिलेली जबाबदारी विश्वासाने पार पाडली गेल्या अडीच महिन्यांपासून पती-पत्नीने पायाला भिंगरी बांधल्यासारखे शहरात गल्लीबोळात सँनी टायझर फवारणी तसेच शहर स्वच्छ ठेवणे आदी जबाबदारी व्यवस्थित रित्या पार पडल्या, म्हणतात ना एखाद्या यशस्वी पुरुषामागे एक स्त्री उभी असते इथे मात्र यशस्वी स्त्री मागे एक पुरूष खंबीरपणे उभे राहिल्याचे चित्र पाहायला मिळाल्याने एक आगळावेगळा पांयडा घोरपडे पती-पत्नीने सातारकरांना घालून दिलेला आहे
पालिकेत बरेच दिवसापासून नवीन घंटागाडी चालू करण्याचा निर्णय हा प्रलंबित होता मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच गुढीपाडव्याला नवीन घंटागाड्या आरोग्य सभापती यांनी सातारकर यांच्या सेवेत आणल्या आरोग्य सभापती पदी अनिता घोरपडे यांची निवड झाल्यानंतर काही दिवसातच करोनाचे संकट आले मात्र आपल्या पदाला कुठेही कमी पणा येणार नाही अशीच जबाबदारी आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी पार पाडली त्यांच्या मागे ठामपणे उभे होते त्यांचे पती अशोक घोरपडे तेही पायाला भिंगरी बांधून शहरात प्रत्येक वॉर्डात जिथे अडचण येईल तिथे फिरत होते राजकारणात प्रत्येक स्त्री मागे एक पुरुष उभा राहिला तर राजकारणात महिलांना कसली अडचण येणार नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे घोरपडे पती-पत्नी