करोनाच्या गडबडीत कांगा काँलनी रस्त्याचे काम मार्गी लावण्याची गडबड

99
Adv

कांगा कॉलनी येथील निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा सुरू करून ते पूर्ण करण्याची गडबड सुरू असल्याचे दिसते लक्ष्मी दर्शनाने हा रस्ता सुरू झाल्याची चर्चा सदरबाजार परिसरात सुरु आहे

सुमारे 75 लक्ष रुपये खर्च करून जरंडेश्वर नाका ते कांगा कॉलनी रस्त्याच्या निकृष्ट कामात भरपूर तक्रारी झाल्या असताना वादग्रस्त रस्त्याचे काम पुन्हा सुरू झाल्याने नागरिक अचंबित झाले आहेत मीच सभापती मीच कॉन्टॅक्टर माझं काम तरी तुम्ही तो अर्ज काढून घ्या असा आदेश बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनी पालिकेच्या फोनवरून तीन महिन्यांपूर्वी अर्जदाराला सांगितले होते त्याची धून ही सातारानामाकडे उपलब्ध आहे

पालिका कुणाकुणावर मेहरबान होतीय याचा रोज नवनवीन शोध लागतोय गोरगरीब जनतेच्या पैशावर डल्ला मारणारे अधिकारी त्यांच्यावर पालिका प्रशासनाचे प्रमुख म्हणून गोरे साहेबांचा वचक नाहीच आणि तो नव्हताच त्यामुळेच सातारा पालिकेची दैयनिय अवस्था करून ठेवली सातारकरांच्या करातून येणाऱ्या पैशावर सगळे गडगंज होत आहेत नक्की कुठे पाणी मुरतंय हा खरा प्रश्न सातारकर नागरिकांना पडला आहे पालिका म्हणजे जणू काही लक्ष्मी दर्शनाचे कुरणच करून ठेवले असल्याचे चित्र सध्या दिसत आहे ज्याला-त्याला लक्ष्मी दर्शन शिवाय काही दिसत नाही असेच झाले आहे

माजी बांधकाम सभापती व विद्यमान नगरसेविका स्नेहा नलवडे यांनीही या रस्त्याच्या संदर्भात आपली तक्रार दाखल केली होती त्यालाही केराची टोपली दाखवण्याचे धाडस पालिका प्रशासनाने केले असून नक्की सत्ता कुणाची हा खरा प्रश्न उभा राहिला आहे

Adv