7 एप्रिल रोजी तीनच विषय वाचून सभा संपवण्यात आली या सभेच्या सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरे न्यायालयात गेल्याने सभागृहाला अडचण ठरू शकते तो विषय मंजूर करू नका हा विषय नगरसेविका मुख्यालय वारंवार मांडत असताना सभागृहात तो मंजूर केला त्यामुळे त्यांनी या सभेतूनच सभा त्या करून निघून गेल्या
विषय क्रमांक १ बाबत, मागील सर्वसाधारण सभेदरम्यान सभागृहात केवळ तीन ते चार विषयांचेच वाचन करण्यात आले असून, उर्वरित विषयांचे तसेच विषयसूचनांचे नियमानुसार
वाचन करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे सभागृहात सुरू असलेल्या कामकाजाबाबत बहुतांश नगरसेवक व उपस्थित सदस्यांना स्पष्ट कल्पना नव्हती. दरम्यान, कामकाज सुरू असतानाच ऑपरेटरमार्फत राष्ट्रगीत सुरू करण्यात आले. त्यावेळी सभागृहातील वातावरण गोंधळाचे असून अनेक सदस्य व उपस्थित व्यक्ती बेसावध अवस्थेत होत्या. काही सदस्यांकडून सभा ध्यक्षांशी मोठ्या आवाजात चर्चा सुरू असल्याचेही निदर्शनास आले. सदर घटनेचे व्हिडिओ चित्रफिती सामाजिक माध्यमांवर प्रसारित झालेल्या आहेत.सदर प्रकरणाच्या अनुषंगाने मा. मुंबई उच्च न्यायालय, कोल्हापूर खंडपीठ येथे जनहित
याचिका क्रमांक ३५४४/२०२६ दाखल करण्यात आलेली असून, संबंधित सर्व विषयांना स्थगिती देण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मागील सभेमध्ये निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळे सभागृहातील कामकाज योग्य पद्धतीने पार पडू शकले नाही तसेच जनहिताच्या विषयांवर अपेक्षित स्वरूपाची सविस्तर चर्चा होणे आवश्यक असताना ती झालेली नाही.
अशा परिस्थितीत मागील सभेचे इतिवृत्त कायम करण्या संदर्भातील विषय पुन्हा सभेपुढे ठेवण्यात आलेला असल्याने, विषय क्रमांक १ तात्पुरत्या स्वरूपात स्थगित ठेवण्यात यावा.
तसेच मागील सभेचे इतिवृत्त पुढील दोन सर्वसाधारण सभांपर्यंत कायम करण्यात येऊ नये असे सौ लेवे यांनी सांगितले






