निकृष्ट पॅचिंग च्या कामाला कोणाचे बळ बांधकाम सभापती देणार का याकडे लक्ष

52
Adv

नगरसेवक शिर्के व गोरे यांच्या प्रभागात चालू असलेल्या पँचिग च्या कामात निष्कृष्टता दिसून येत असून बांधकाम सभापती काकडे काय भूमिका घेणार याकडे या प्रभागातील नागरिकांचे लक्ष लागले

काशी विश्वेश्वर मंदिर ते नगरसेवक शिर्के घर अखेर रस्त्याचे पॅचिंग चालू आहे हे पॅचिंग अत्यंत निकृष्ट असून याला कोणाचे पाठबळ आहे हे मात्र समजले नाही नगरसेवक शिर्के यांच्याशी संपर्क मात्र होऊ शकला नाही बांधकाम सभापती मिलिंद काकडे यांनाही याबाबत विचारले असता नुसते हो हो हो च केले त्यामुळे नक्की या कामात सुद्धा दर्शन लक्ष्मीचे झाले की काय अशी चर्चा येथील नागरिक करत होते

संबंधित रस्त्याचे पॅचिंग चे काम चालू असताना पालिकेचे इंजिनिअर तिथे दिसले नाही त्यामुळे नक्की गुणवत्ता तपासणार कोण हा खरा प्रश्न आहे या ठेकेदारांने केलेले पॅचिंग ची गुणवत्ता क्वालिटी कंट्रोल थर्ड पार्टी कडून तपासावी मगच याचे बिल अदा करावे अशी अपेक्षाही येथील नागरिकांनी व्यक्त केली

Adv