खा श्री छ उदयनराजे यांनी केले चौपाटीचे नव्या जागेत पुनर्वसन

257
Adv

गेल्या काही महिन्यापासून अधांतरी लटकलेल्या चौपाटीच्या पुनर्वसनाची कोंडी खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी फोडली . जलमंदिर येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे यांच्या उपस्थितीत लकी ड्रॉ काढून 72 विक्रेत्यांचे पुनर्वसन राजवाड्याजवळील जुन्या पशुवैद्यकीय दवाखान्यालगतच्या मोकळ्या जागेत करण्यात आले .

येत्या दोन तीन दिवसात नवीन जागेवर चौपाटी सुरू होईल असे संकेत जलमंदिरच्या सूत्रांनी दिले . यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगरसेवक अॅड दत्तात्रय बनकर स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब ढेकणे, जितेंद्र खानविलकर,पालिकेचे अतिक्रमणं निरीक्षक प्रशांत निकम इ यावेळी उपस्थित होते .

पशुवैद्यकीय दवाखान्या लगतच्या जागेत चायनीज गाडा विक्रेत्यांचे हे तात्पुरते पुनर्वसन करण्यात येत असून युनियन क्लबच्या पिछाडीला असणाऱ्या 46 गुंठे मोकळ्या जागेत सर्व सुविधांसह चौपाटी सुरू करण्याचे नियोजन असून त्याचा आराखडा बनविण्याचे काम सुरू आहे . या बैठकीत उदयनराजे यांनी सर्व विक्रेत्यांना पर्यायी जागेत तूर्त काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या .पशुसंवर्धन दवाखान्या लगतच्या मोकळ्या जागेत पांढरे पट्टे आखून त्यावर क्रमांक टाकण्यात आले होते . त्या क्रमांकाच्या चिठ्ठया टाकून विक्रेत्यांच्या नावाचा पुकारा प्रशांत निकम यांनी यादीनिहाय केला . ज्याने ज्या क्रमांकाची चिठ्ठी उचलली त्याला ती जागा गाडयासाठी आठ बाय दहाची जागा सोडतीद्वारे देण्यात आली . या चौपाटी ला सर्व सुविधा देण्याची सूचना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केली . सर्व विक्रेत्यांनी या पुनर्वसनाबद्दल उदयनराजे यांचे आभार मानले .

Adv