भावेनगर शेजारी असणाऱ्या क्रेशरच्या धुळीमुळे पिकांचे नुकसान* काट्यातील बंधाऱ्यावरून जड वाहनांची वाहतूक

152
Adv

पिंपोडे बुद्रुक-प्रतिनिधी
उत्तर कोरेगावं तालुक्यातील भावेनगर जवळ असणाऱ्या क्रशरच्या धुरळ्या मुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत असून काट्यातील बंधाऱ्यावरून जड वाहनांची वाहतूक होत असल्याने बंधाऱ्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या बाबत सविस्तर वृत्त असे की पिंपोडे बुद्रुक भावेनगर परिसरात क्रेशरचा धुरळा उडत असल्याने आजूबाजूच्या शेतकऱ्यांचे नुकसान होत असून काटा नावाच्या परिसरात असणाऱ्या बंधाऱ्यावरून जड वाहतूक होत असल्याने बंधाऱ्याच्या भराव खचण्याची शक्यता असल्यामुळे अशी जड वाहतूक बंद करण्यात यावी अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.काट्यामधील बंधारा हा आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी फायदेशीर आहे.परंतु त्या बंधाऱ्यावरून जड वाहतूक होत आहे.या पूर्वी या बंधाऱ्यामधून गाळ काढण्यात आल्यामुळे पाणी साठ्यात वाढ झालि आहे.त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या विहिरींना त्या पाण्याचा फायदा होत आहे.परंतु राजकीय पुढार्यांना हाताशी धरून बंधाऱ्यावरून जड वाहतूक होत असून क्रशरच्या धुरळ्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीवर त्याचा परिणाम होत आहे.त्यामुळे अशी जड वाहतूक बंधाऱ्यावरून बंद करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
वास्तविक एकाच्या फायद्यासाठी शेतकऱ्याचे मात्र नुकसान होत असल्यामुळे शेतकऱ्यांना वाली कोण असा सवाल शेतकरी करीत असून प्रशासनाने याबाबत गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा.एवढीच अपेक्षा शेतकरी करीत आहेत.

Adv