भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या आव्हानाला सातारा जिल्ह्यातील 123 ग्रामपंचायतींनी प्रतिसाद दिला असून तब्बल 123 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा लागेल तेवढा विशेष विकास फंड मी तुम्हाला देतो असे आवाहन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले होते या आव्हानाला जिल्ह्यासह राज्यातूनही प्रचंड प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा असे म्हणणारे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले हे एकमेव पहिले लोकप्रतिनिधी होय
जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतीमध्ये २ हजार ८१३ वार्डमधून ७ हजार २६६ उमेदवार निवडून देण्यासाठी १७ हजार ६५६ जणांनी अर्ज दाखल केले होते. छाननीच्या दिवशी जिल्ह्यातील २५२ जणांचे अर्ज बाद झाले. सोमवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून, १२३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर अंशतः ९८ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. २ हजार ६३१ उमेदवार बिनविरोध झाले असून, आता ६५४ ग्रामपंचायतीमध्ये ९ हजार ५२१ जण निवडणूक रिंगणात आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूक फिवर सुरू आहे. सोमवारी अर्ज मागे अन चिन्ह वाटप झाले. लढतीचे चित्र स्पष्ट झाले. सातारा तालुक्यातील ९० ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, २१ ग्रामपंचायत बिनविरोध तर १७ ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. कराड तालुक्यातील ८७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, १७ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. पाटण तालुक्यातील ७२ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून,१८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर १७ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झालेल्या आहेत. कोरेगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर चार ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाल्या आहेत.
वाई तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून, ९ ग्रामपंचायती बिनविरोध तर १० ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. खंडाळा तालुक्यातील ५० ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून ६ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर १ ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध होणार आहे. महाबळेश्वर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून ९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत १९ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. फलटण तालुक्यातील ७४ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून ६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.
जावली तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून १२ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर २५ ग्रामपंचायती अंशतः बिनविरोध झाल्या आहेत. माण तालुक्यातील ४७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून १३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत तर १ ग्रामपंचायत अंशतः बिनविरोध झाली आहे. खटाव तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार असून ९ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत. तर ४ अंशतः बिनविरोध झाल्या आहेत.