पिंपोडे बुद्रुक-प्रतिनिधी-
येथील ग्रामीण रुग्णालया शेजारी असणारे जुने प्राथमिक आरोग्य केंद्र हे प्रेमी युगलांचा अड्डा बनले असून या ठिकाणी संबंधित प्रशासनाने नाना-नानी गार्डन बनवावे अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
या बाबत सविस्तर वृत्त असे की पिंपोडे बुद्रुक ता.कोरेगावं येथे संबंधित प्रशासनाने काही वर्षांपूर्वी ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती होण्यापूर्वी मध्यवर्ती ठिकाण असणारे प्राथमिक आरोग्यकेंद्र रुग्णांना सेवा देण्यासाठी बांधण्यात आले होते.परंतु हेच आरोग्यकेंद्र प्रशासनाने वाठार स्टेशन या ठिकाणी हलवले.परंतु या ठिकाणी असलेल्या जुन्या प्राथमिक केंद्राची इमारत आता पडलेल्या अवस्थेत आहे.त्या पडलेल्या इमारती मध्ये गेल्या काही वर्षांमध्ये प्रेमी युगलांचा जणू अड्डाच बनली आहे.त्यामुळे संबंधित प्रशासनाने त्याठिकाची जुनी इमारत पाडून त्या ठिकानी सुसज्ज असे नाना-नानी पार्क बनवण्याचा प्रयत्न करावा.
या ठिकाणी गार्डन झाल्यास शेजारी असणारया ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना आणि नागरिक यांना चांगल्या प्रमाणात दिलासा मिळेल तरी संबंधित प्रशासनाने या जागेचा उत्तम प्रकारे उपयोग करून गार्डन बनवावे व त्या माध्यमातून सर्वाना त्याचा लाभ होईल.अशी चर्चा नागरिक आणि रुग्णांमधून केली जात आहे.