विनापरवाना फोटो लावल्याबद्दल शशिकांत शिंदे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

154
Adv

कुडाळ जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक लागली असून यामध्ये राष्ट्रवादीतर्फे दीपक पवार हे अधिकृत उमेदवार असून त्यांचे विरोधी उमेदवार मालोजीराव शिंदे यांनी विना परवानगी घेत माजी आमदार शशिकांत शिंदे यांचा फोटो लावल्याने गोंधळ झाला होता फोटो लावल्यामुळे शशिकांत शिंदे यांच्याकडून मालोजीराव शिंदे यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई करावी अशी तक्रार राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी दिली आहे

माझी परवानगी न घेता फोटो लावलेला आहे त्यामुळे मला ते अडचणीचे ठरू शकतं आमच्या पक्षाचा रीतसर उमेदवार आहे त्यामुळे विरोधी उमेदवारा ने माझी कोणतीही परवानगी न घेता फोटो लावल्यामुळे तक्रार दाखल केली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी सातारानामा शी बोलताना सांगितले

कुडाळ जिल्हा परिषद गटाच्या पोट निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार मालोजी शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदे यांचा फोटो लावल्याने कुडाळ गटात एकच खळबळ माजली होती परंतु राष्ट्रवादी चे नेते शशिकांत शिंदे यांनी तक्रार दिल्याने या सर्व गोष्टीवर पडदा पडला आहे निवडणूक आयोग यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Adv