दमयंतीराजेंच्या गुळूंब, खंडाळा येथील प्रचारास महिलांचा उत्‍सफूर्त प्रतिसाद

71
Adv

  सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्‍यासह विधानसभेसाठीचे उमेदवार सातार्‍यातील उमेदवार श्रीमंत .शिवेंद्रसिंहराजे भोसले, वाई खंडाळा महाबळेश्‍वर मतदारसंघातील उमेदवार मदनदादा भोसले यांच्‍या निवडणुकप्रचारार्थ श्रीमंत छत्रपती सौ. दमयंतीराजे भोसले यांच्‍या प्रमुख उपस्‍थितीत नुकताच महिला कार्यकर्तींनी ठिकठिकाणी प्रचारदौरा काढला.

 सातारा तालुक्‍यात लिंब येथे झालेल्‍या प्रचारसभेस कर्‍त्‍यंव्‍य सोशल ग्रुपच्‍या संस्‍थापिका सौ. वेंदांतिकाराजे भोसले यांचीही उपस्‍थतिथी होती. याशिवाय वाई तालुक्‍यात भुईंज, गुळूंब, खंडाळा येथेही महिलांनी प्रचार सभा घेतल्‍या. या दौर्‍यात भाजपाच्‍या  सौ निता केळकर, सौ. सुवर्णादेवी पाटील, सौ. चित्रलेखा माने कदम, सौ. नीलिमा भोसले आदींसह प्रमुख महिला पदाधिकार्‍यांचीही प्रमुख उपस्‍थिती होती.

 मतदारसंघाच्‍या विकासासाठी भारतीय जनता पक्ष व मित्रपक्षांच्‍या उमेदवारांना मोठ्या मताधिक्‍क्‍याने निवडून द्यावे, असे आवाहन सौ. दमयंतीराजे यांनी ठिकठिकाणच्‍या सभांमध्‍ये केले. या निवडणुकीद्वारे जनता जनार्दनाने महाराजांना सलग चौथ्‍यांदा लोकसभेत पाठविण्‍यासाठी केलेला निश्‍चय प्रत्‍यक्षात आणतानाच विधासभेच्‍या उमेदवारांनाही पाठबळ द्यावे. त्‍यामुळे केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या माध्‍यमातून विकासगंगा गतीने प्रवाहीत होईल, असेही त्‍या म्‍हणाल्‍या.

 

 भुईंज (ता. वाई) येथे शिवकन्‍या राणूअक्‍का जाधवराव यांच्‍या ऐतिहासिक वाड्यामध्‍ये झालेल्‍या महिला मेळाव्‍यातही उपस्‍थित महिलांनी भाजपच्‍या उमेदवारांना प्रचंड मताधिक्‍क्‍य देण्‍यासाठी प्रयत्‍नशील राहाणार असल्‍याचे सांगितले.

 

 

Adv