कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जारी केले आहेत. तसेच कोणतीही व्यक्ती सार्वजनिक किंवा खासगी मालमत्ते थुंकल्यास संबंधी क्षेत्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेने संबंधित व्यक्तीस 200 रुपये एवढ्या रकमेचा दंड वसूल करण्याची कार्यवाही करावी, असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपायोजनेचा एक भाग म्हणून सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.4 च्या लगत असणारी सर्व कंदी पेढे व मिठाई विक्रीची दुकाने 31 मार्च 2020 पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थान कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही ओदशात नमुद करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील सर्व निवासी तालीम व स्पा (मॉलीश सेंटर) 31 मार्च 2020 अखरे पूर्णपणे बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थान कायदा 2005 मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही ओदशात नमुद करण्यात आले आहे.