नगरसेविका सुमिती खुटाळे राजीनाम्याच्या पवित्र्यात?

104
Adv

प्रभाग क्रमांक 11 च्या नगरसेविका समिती खुटाळे यांनी आज थेट नगराध्यक्षांच्या दालनात राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आणि एकच खळबळ माजली दरम्यान नगराध्यक्ष माधवी कदम यांनी मध्यस्थी केल्याने सर्व वादावर पडदा पडला

प्रभाग क्रमांक अकरा च्या नगरसेविका सुमिती खुटाळे यांना गेल्या एक वर्षापासून वारंवार डावलण्यात येत होते कोणतेही काम प्रभागांमध्ये होत असल्यास संबंधित ठेकेदार व इंजिनियर कोणतीही कल्पना न देता हे काम परस्पर करत होते जुना मोटर स्टँड येथील रस्त्याचे काम चालू असून संबंधित नगरसेविका सुमिती खुटाळे यांना कोणतीही कल्पना दिली गेली नाही. असे होणार असेल तर आमचा राजीनामा घ्या अशी भूमिका नगरसेविका खुटाळे यांनी घेतल्याने नगराध्यक्षांच्या दालनात एकच खळबळ उडाली दरम्यान नगराध्यक्ष माधवी कदम यांनी संबंधित इंजिनियर यांना सूचना केल्या की संबंधित प्रभागातील कामाची माहिती नगरसेविका खुटाळे यांना देण्यात यावी सर्व नगरसेवक नगरसेविकांना अशी माहिती देत चला त्यामुळे कोणाचा गैरसमज होणार नाही असा सल्लाही नगराध्यक्ष माधवी कदम यांनी इंजिनिअर यांना दिला

दरम्यान प्रभाग क्रमांक 11 च्या नगरसेविका सुमिती खुटाळे यांच्यावर राजीनामा देण्याची वेळ का आली हा खरा मोठा प्रश्न आहे नगरसेविकेला अशी वागणूक मिळत असेल तर सामान्य नागरिकांचे काय असा प्रश्न सातारकर नागरिक विचारू लागले आहेत नगरसेविका खुटाळे गेल्या एक वर्षापासून का नाराज आहेत हे मात्र समजू शकले नाही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही

दरम्यान नगरसेविका खुटाळे प्रकरणी नगराध्यक्ष माधवी कदम यांनी सर्व प्रकारावर पडदा पाडला असून कोणत्याही नगरसेवक नगरसेविकेला संबंधित प्रभागातील माहिती देण्यास ठेकेदार व संबंधित इंजिनीयर बंधनकारक असल्याचे सांगितले

Adv