सातारा पालिकेतील मुंगळ्याला तत्कालीन सभापतींनी बदली केली होती मात्र नूतन सभापतींच्या मर्जीने पुन्हा मुंगळा पाणीपुरवठा विभागात येऊन चिटकला
सातारा पालिकेतील पाणीपुरवठा चे माजी तत्कालीन सभापती यांनी त्या मुंगळ्याला पाणीपुरवठा विभागातून काढून टाकले होते तेव्हापासून हा मुंगळा जास्त तररररर होता या मुंगळ्याला लक्ष्मी दर्शन झाले नव्हते कहर म्हणजे बरेच सातारा शहर व आजूबाजूच्या परिसरात या मुंगळ्यांने बोगस कनेक्शन दिल्याच्या घटना घडल्या आहेत ? त्या तपासण्याची जबाबदारी आता संबंधित पाणीपुरवठा सभापतीं व प्रशासनावर येऊन ठेपली आहे
सातारा पालिकेत नुकतेच हजर झालेले हुशार व कायद्यावर बोट ठेवणारे मुख्याधिकारी अभिजित बापट यांना या मुंगळ्याची खडा न खडा माहिती आहे मुख्यधिकाऱ्यांनी सुद्धा या मुंगळयावर आपला वचक दाखवून संबंधित विभागातून त्याची हकालपट्टी करावी व आपला कारभार पारदर्शक असल्याचे सातारकरांना दाखवून द्यावे अन्यथा पुलाखालून बरेच पाणी गेले असल्याची शंका सातारकरांना आल्याशिवाय राहणार नाही
लिगली कनेक्शन घेताना सर्वसामान्य माणसाला मिळताना खूप त्रास होतो मात्र या बहादूर मुंगळयाने अनाधिकृत कनेक्शन देऊन बरीच मोहमाया जमवली आहे त्याचाही पर्दापाश करोणाचे संकट संपल्यावर करणार असल्याचे काही नगरसेवकांनी सातारानामाकडे आवर्जून सांगितले
क्रमश