निलंबित आरोग्य निरीक्षकांना कामावर रुजू करून घेऊ नये अमित शिंदे यांची नगरविकास मंत्री यांच्याकडे मागणी

61
Adv

सातारा : लाचखोरीच्या प्रकरणातून निलंबित करण्यात आलेल्या पालिकेच्या तीन आरोग्य निरीक्षकांना कामावर हजर करून घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. असे झाल्यास पालिकेत पुन्हा एकदा भ्रष्टाचार वाढेल. त्यामुळे या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत संबधितांना कामावर रुजू करून घेऊ नये, अशी मागणी अमित शिंदे यांनी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सातारा पालिकेतील लाचखोरीचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोग्य निरीक्षक राजेंद्र कायगुडे, प्रवीण यादव व गणेश टोपे यांना अटक करण्यात आली होती. सध्या त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या तिन्ही आरोग्य निरीक्षकांना पुन्हा कामावर घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

असे झाल्यास सातारा पालिकेत भ्रष्टाचार वाढेल व जनमानसातील पालिकेची प्रतिमा पुन्हा एकदा मलिन होईल. त्यामुळे न्याय निवाडा होईपर्यंत संबंधित अधिकाऱ्यांना कामावर रुजू करून घेऊ नये अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

Adv