श्री छ उदयनराजेंनी घेतला नगरसेवकांकडून विविध कामांचा आढावा

80
Adv

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी बोलावलेल्या सातारा विकास आघाडीच्या बैठकीत अनेक विषयांवर चर्चा झाली . लक्ष्मी टेकडी येथे बीव्हीजीने घरकुलाची अर्धवट सोडलेली कामे, करंजे येथील पाण्याच्या टाकीच्या जागेचा वाद या अर्धवट रखडलेल्या कामांचा उदयनराजे यांनी आढावा घेतला

खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंग पाळत सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांची दीड तास बैठक झाली . नगरसेवक वसंत लेवे व विशाल जाधव यांची बैठकीस अनुपस्थिती होती . सविता फाळके प्रकृती अस्वास्थामुळे बैठकीला हजर नव्हत्या . लक्ष्मी टेकडी येथील बीव्हीजी कंपनीने घरकुलांची कामे पूर्ण केली मात्र त्यात अनेक त्रुटी राहून गेल्या, या विषयावर उदयनराजे यांनी पदाधिकाऱ्यांना ही कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या . गेल्या साडेतीन वर्षात आपण शहरात मोठे प्रकल्प सातारकरांच्या हितासाठी उभे केले आहेत . कोणतीही विकास कामे अर्धवट राहता कामा नये, करंजे येथील पाण्याच्या टाकीच्या जागेचा विषय तांत्रिक बाजू तपासून सामंजस्याने सोडवण्याची सूचना उदयनराजे यांनी केली .

येत्या 10 जुलै रोजी पालिकेची सर्वसाधारण सभा होत आहे मात्र ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याच्या सूचना नगरविकास विभागाच्या वतीने घेण्यात आल्या आहेत . ती व्यवस्था कशी असणार याची माहिती घेण्याचा उदयनराजे यांनी प्रयत्न केला . मात्र बैठकीत पुरेशा माहितीअभावी सविस्तर चर्चा होऊ शकली नाही . सातारकरांना घरपट्टी माफ करण्यात यावी असा विषय सर्वसाधारण सभेच्या अजेंडयावर घेण्यात आला आहे सातारकरांच्या हितासाठी पालिकेचा कारभार गतिमान ठेवा अशा सूचना उदयनराजे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या

Adv