जिल्हयात १० दिवसांचा जनता कर्फयू करावा. सातारा शहर शिवसेनेची मागणी.

76
Adv

सध्या सातारा जिल्हयात कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून अजूनही नागरीकांना त्यांचे गांभीय राहिलेले नाही. दुकाने, भाजीमंडई इ. ठिकाणी सोशल डिस्टसिंग न पाळता नागरिक विनाकारण गर्दी करीत आहेत. प्रशासन आपले
काम चोख करीत असुन सुध्दा जनता त्यांना साथ देत नाही. सध्याचा दररोजचा वाढता आकडा पाहता कोरोनाच्या सामुहिक संक्रमणाची भिती निर्माण झाली आहे.तरी अनेक नागरिकांनी मागणी केली आहे. आणि सातारा शहर शिवसेना ही या
पत्रकाद्वारे मागणी करीत आहे कि कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी सातारा जिल्हा पूर्ण १० दिवस कडक जनता करावा

या कर्फ्यू मध्ये फक्त अत्यावश्यक सेवा सोडून कोणासही सवलत देवू नये. तरच ही कोरोनाची साखळी तोडण्यास आपणयशस्वी होवू. मा. जिल्हाधिकारी हे सक्षम व अभ्यासू अधिकारी आहेत. ते आमच्या मागणीचा व सुचनेचा नक्कीच विचार करतील आणि लवकरात लवकर सातारा जिल्हयात १०
दिवसाचा एकदम कडक जनता कफ्र्यु लागू करावा अशी मागणी सातारा शहर शिवसेनेच्या वतीने बाळासाहेब शिंदे शहरप्रमुख म्हणून आपणांस करण्यात येत आहे. असे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

Adv