पालिकेचा साताऱ्यात अतिक्रमणांवर हातोडा पोवई नाक्यावरील पत्र्याचे शेड हटवले, व्यावसायिकांच्या फरशा व कट्टेही उखडले प्रचंड वादावादी तगडा पोलीस बंदोबस्त

120
Adv

ग्रेड सेपरेटरच्या पोवई नाका ते शाहू चौक या कामाला गती आल्याने पालिकेच्या शहर विकास विभागाने पोवई नाक्यावरील अतिक्रमणांवर हातोडा उगारला . येथील सयाजी हायस्कूल मैदानालगतचे विक्रम बापू माने ( 166 रविवार पेठ ) याचे पत्र्याचे शेड उखडून टाकण्यात आले . यावेळी अतिक्रमण हटाव पथकाचे कर्मचारी व नागरीक व महिला पांच्यात प्रचंड वादावादी झाली .

बडयांची आधी अतिक्रमणे काढा मग आमचे बघू असे म्हणत काही जणांनी गोंधळ. घातला मात्र पोलीस बंदोबस्त तैनात झाल्यावर मोहिमेला गती आली आणि मोहिमेला विरोध करणारे घटनास्थळावरून गायब झाले .मेळवणे कोल्ड्रिक्स, कबाडी पावभाजी या दोन व्यावसायिकांचे फरशी बांधकाम बालाजी प्राईड या इमारतीचा पाकिंग रँम्पचा काही भाग तोडून काढण्यात आला . ग्रेड सेपरेटरच्या पुलाच्या भिंतीपासून सेवा रस्ता हा आठ मीटरचा प्रायोजित आहे . या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभाग व नगरपालिकेने संयुक्त पाहणी केली व 166 रविवार पेठ येथील अतिक्रमणांना 52-53 च्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या . शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या जाग्यावर विक्रम माने यांनी उभारलेले शेड वादग्रस्त होते . अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांचा फौजफाटा सकाळी सव्वाअकरा वाजता घटनास्थळी तैनात होताच काही महिला व नागरिकांनी हुज्जत घालायला सुरवात केली . जेसीबीची कारवाई सुरू होताच परिसरातील काही महिलांनी तावातावाने भांडायला सुरवात केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र निकम- अष्टेकर या जोडीने पोलीस बंदोबस्त मागवून धडक कारवाई सुरू केल्याने फुकटची जागा लाटणाऱ्यांची तंतरली . जेसीबीचे पाते पत्राशेडच्या मुळाला जाताच पळा पळ सुरू झाली .पालिकेने पत्र्याच्या शेडसह , आईस्क्रिम व पाव भाजी विक्रेत्याचे फरशी बांधकामही उखडून काढले पोलीस बंदोबस्त जय्यत असल्याने कोणी ब्र उच्चारला नाही . धडाधड अतिक्रमणे निघू लागल्याने आठ मी . सेवा रस्त्याच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला .
चौकट-
अतिक्रमण मोहिमेचे तब्बल सहा तास
शहर विकास विभागाने आज खरी धडाडी दाखवत मोठी अतिक्रमणे जमीनदोस्त केली . कोठेही बोटचेपेपणा न दाखवता मोठया धडक कारवायांमुळे रविवार पेठेतील ग्रेड सेपरेटरचा सेवा रस्ता मोकळा करण्यात आला . अतिक्रमणाची खोल बांधकामे तोडताना नाक्यावरील पिंपळ पाराचा जमिनीत दबलेला भाग उघडा पडला . या पाराचे बांधकाम 1852 सालात श्रीमंत शहाजी राजे यांनी केल्याचा शिलालेख उघडा झाला . त्यावर अन्नछत्र अशी नोंद आढळून आली . हा धडधडीत पुरावा प्रकाशात आल्याने कथित कर्मवीर पाराचा फुगवण्यात आलेला फुगा आपोआप फुटला आहे .

Adv