मंत्रिमंडळ विस्तार आकडे जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते पाटण चे शिवसेनेचे आमदार शंभूराज देसाई व राष्ट्रवादीचे कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील यांची वर्णी लागली असून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत
शिवसेनेचे शंभूराज देसाई हे एकमेव शिवसेनेच्या धनुष्यबान या चिन्हावर पाटण मतदार संघातून तीन वेळा निवडून आले आहेत एक निष्ठेचे फळ म्हणून मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी त्यांना मंत्रिपदाची माळ गळ्यात घातली असल्याचे जिल्ह्यातून बोलले जात आहे तसेच दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांचे एकनिष्ठ सहकारी म्हणून जिल्ह्यातून आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे पाहिले जाते त्यांनाही राष्ट्रवादीकडून उद्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान देण्यात आले आहे या दोन्ही नेत्यांचा शपथ ग्रहण समारंभ मुंबई येथे पार पडत असून त्यांच्या समारंभासाठी शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत