जि.प सभापती निवडीवर उपमुख्यमंत्री अजित दादांची मोहर

205
Adv

जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापती निवडीच्या अनुषंगाने पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत महिला बाल कल्याणसाठी सोनाली पोळ, समाज कल्याणसाठी कल्पना खाडे, शिक्षणसाठी मानसिंग जगदाळे, कृषीसाठी मंगेश धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली.

मंगेश धुमाळ व सोनाली पोळ यांची निवड ही थेट राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच केल्याचे समजते दरम्यान निवडीनंतर जिल्हा परिषद सदस्य अरुण गोरे व सुरेंद्र गुदगे यांनी अधिकारी यांना विविध मुद्द्यावरून चांगलेच धारेवर धरले

पिठासीन अधिकारी विधुत वरखेडकर यांनी काम पाहिले. विरोधात अर्ज दाखल केलेल्या कृषी सभापतीपदासाठी काँग्रेसचे शंकर खबाले, शिक्षणसाठी पाटण विकास आघाडीचे विजय पवार, शिवसेनेच्या सुग्रा बशीर खोंदु यांनी महिला व बाल कल्याणसाठी, तर समाज कल्याणसाठी काँग्रेसच्या मंगल गलांडे यांनी अर्ज मागे घेतले. माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर व विद्यमान अध्यक्ष उदय कबुले यांच्या विंनतीवरून विरोधात भरलेले अर्ज मागे घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.

Adv