पालिकेच्या वतीने देण्यात येणारा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर पुरस्कार देण्यासाठी विलंब झाला असून सातारकर नागरिकांमध्ये पालिकेच्या बाबतीत तीव्र नाराजी पसरली आहे
डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी आपल्या साताऱ्याचे नाव उज्वल केले त्यांचा नावाने देण्यात येणारा पुरस्काराचा विसर सातारा पालिकेला कसा पडला हाच खरा प्रश्न असल्याचे सातारकर नागरिक विचारत आहेत
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने सातारा पालिकेचे तत्कालीन उपनगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती राज्यातील दिग्गज मान्यवरांना हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले परंतु हा पुरस्कार देऊन जवळपास वर्ष लोटले तरी पालिकेला याची आठवण झाली नाही पुरस्काराबाबत नक्की कोणाच्या मनात अंधश्रद्धा आहे असा प्रश्न सातारकर नागरिक विचारत आहेत
याबाबत कमिटीचे सदस्य विनोद कुलकर्णी यांना याबाबत विचारले असता उपनगराध्यक्ष किशोर शिंदे व नगरसेवक दत्तात्रय बनकर यांच्याशी चर्चा झाली आहे लवकरच हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे सांगितले दरम्यान याबाबत बैठक न झाल्याने नाराज असून लवकरात लवकर हा पुरस्कार देण्यात यावा अशी अपेक्षा असल्याचे पुरस्कार कमिटीचे सदस्य विनोद कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले
(पालिकेचा गौरव वाढवणारा हा पुरस्कार असून लवकरात लवकर पुरस्कार देण्यात यावा अशी मागणी सातारानामाशी बोलताना नगरसेवक अमोल मोहिते यांनी केली आहे)
नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्याशी चर्चा करून लवकरच पुरस्कार कर्त्याचे नाव जाहीर करून हा सोहळा कसा चांगला होईल असे प्रयत्न करणार असल्याचे पाणीपुरवठा सभापती यशोधर नारकर यांनी सातारानामा शी बोलताना सांगितले