जवळपास आठ महिन्यांपूर्वी महसूलमंत्री पदी चंद्रकांत दादा पाटिल असताना पालिकेचा पोहण्याचा तलाव याच्या सुशोभीकरणासाठी पाठपुरावा केला असल्याची माहिती नगरसेविका सिद्धी पवार यांनी दिली आहे
पालिकेचा पोहण्याचा तलाव गेल्या चार वर्षापासून बंद अवस्थेत आहे याकडे कुणाचे लक्ष नव्हते या प्रभागाच्या नगरसेविका सिद्धी पवार यांनी आठ महिन्यांपूर्वी माजीमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे मंत्रालयात जाऊन पोहणाच्या तलावासाठी निधी द्यावा त्यासाठी पाठपुरावा केला होता त्यावेळेस महसूल मंत्रीपदी असलेले चंद्रकांत दादा पाटील यांनी याला मान्यता दिली होती आता येणाऱ्या 13 तारखेला जनरल सभेमध्ये हा विषय घेतला असून लवकरच पोहण्याचा तलाव विषय मार्गी लागणार असल्याची माहिती नगरसेविका सिद्धी पवार यांनी सातारानामा शी बोलताना दिली आहे
तलावाच्या दुरुस्तीसाठी तब्बल तीन कोटी रुपये एवढा खर्च होणार असून तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्राद्वारे कळले होते की वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून याची दुरुस्ती व्हावी. लवकरच शहरातील मुलांना पालिकेचा पोहण्याचा तलाव पुन्हा एकदा खुला होणार हे नक्की सर्व प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व विविध मान्यवरांच्या हस्ते मोठा भूमिपूजन सोहळा घेणार असल्याची माहिती नगरसेविका सिद्धी पवार यांनी यावेळी दिली