राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानांतर्गत आढावा बैठक संपन्न

552
Adv

राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानांतर्गत आढावा बैठक विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.नामदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा पक्ष कार्यालय सातारा येथे पार पडली.

यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले की, राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय अभियानांतर्गत सद्य परिस्थितीत सातारा जिल्हा हा राज्यात पाचव्या क्रमांकावर आहे व विधानसभा मतदार संघनिहाय विचार केला असता २८८ मतदार संघांपैकी सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदार संघ चौथ्या क्रमांकावर असून फलटण सहाव्या क्रमांकावर आहे. बाकीच्या विधानसभा मतदार संघांनी त्यानुसार प्रयत्न करणे गरजेचे आहे. पक्षाच्या सर्व फ्रंटल सेलनी त्यामध्ये प्रामुख्याने युवक, विध्यार्थी, महिला, अल्पसंख्यांक यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचून या अभियानातंर्गत युवक व महिलांचा अभिप्राय नोंदवून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून पक्षाबद्दलची मते जाणून घेऊ शकतो.

पालकमंत्री बाळासाहेब पाटील म्हणाले की, १९९९ पासून सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. पवार साहेबांच्या विचारांची पठराखन करणारा जिल्हा आहे.आणि पक्षाच्या सर्व अभियानात जिल्हा अग्रेसर राहिलेला आहे त्याचप्रमाणे पक्ष अभिप्राय अभियानात सुद्धा सातारा जिल्हा क्रमांक एक नंबर राहील. अजून २५ तारखेपर्यंत अवधी आहे.पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना त्यांचा अभिप्राय देण्यास प्रोत्साहित करावे. असे आवाहन पालकमंत्री नामदार बाळासाहेब पाटील यांनी केले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील सामान्य नागरिकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने टोल फ्री हेल्पलाईन चालू होणार असून ही हेल्पलाईन २४ तास सेवेत असणार आहे. या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

विधान परिषदेचे सभापती नामदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी संपूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला व सर्व जिल्ह्यात अतिशय चांगले काम सुरू आहे. अभियानास अजूनही सात दिवस बाकी असून आपण एक नंबर वर जाऊन सातारा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे दाखवून देऊ असे मत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केले व आभार सरचिटणीस राजकुमार पाटील यांनी मानले.

याप्रसंगी प्रभाकर घार्गे, प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, मंगेश धुमाळ, सोनाली पोळ, दीपक पवार, देवराज पाटील, दत्ता नाना धमाळ, बाबुराव सपकाळ, समिंद्रा जाधव, जयश्री पाटील, कविता म्हेत्रे, राजाभाऊ उंडाळकर,सतिश चव्हाण, भास्कर कदम, मिलिंद नेवसे, शफीक शेख,तेजस शिंदे अतुल शिंदे बाळासाहेब सोळस्कर, युवराज सूर्यवंशी, बाळासाहेब सावंत,दत्तात्रय साळुंखे, राजाभाऊ लावंघरे, मारुती इदाटे, निवास शिंदे,गोरखनाथ नलावडे,प्रसन्न बाबर ,राजेंद्र कचरे, राजेश पाटील वठारकार आदी उपस्थित होते.

Adv