ऐतिहासिक गोल बागेची केली कचराकुंडी अतिक्रमण व आरोग्य विभागाने कारवाई करण्याची नागरिकांची मागणी

269
Adv

ऐतिहासिक गोल बागेची येथे छोट्या-मोठ्या बसणाऱ्या विक्रेत्यांनी अक्षरशा कचराकुंडी केल्याचे चित्र आज दिसून आले

छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्यांनी गोल बागेची कचराकुंडी केल्याचे दिसते येथे चप्पल वाले ,फनस विक्रेते आधी चा व्यवसाय करणारे छोटे-मोठे नागरिक प्रचंड प्रमाणात दिसून येतात व्यवसाय करण्यास कोणाची हरकत नाही मात्र जिथे आपण बसतो तिथे घाण करण्याचीही पद्धत कुठली यावर आरोग्य व अतिक्रमण विभागाने यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सातारकर नागरिकांनी केली आहे

करोना च्या महामारीत आरोग्य सभापती अनिता घोरपडे यांनी चांगले काम केले. गेल्या दोन महिन्यापासून येथे काडीभर कचरा नव्हता आता मात्र या व्यवसाय करणाऱ्यांनी बागेची चक्क कचराकुंडीच केल्याचे दिसते एकीकडे करोना सारखी महामारी असताना आपण घाण करून सातारकरांचे आरोग्य किती धोक्यात घालतोय याचे भान मात्र या व्यवसाय करणाऱ्यांना समजले नसावे

Adv