पुणे बायोमेडिकल वेस्ट प्रकरणी सातारा विकास आघाडीने दिले गृहराज्यमंत्री देसाई यांना निवेदन

136
Adv

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील बायोमेडिकल वेस्ट पुण्याच्या आसपासचे प्लांट सोडून सातारा नगरपरिषदेच्या सोनगाव येथील कचरा डेपो वरील प्लॉटवर डिस्प्लेज करता पाठवण्यात आले होते सदर बायोमेडिकल वेस्ट पाठवण्यास कोणी परवानगी दिली होती तसेच शिरवळ चेक पोस्ट वरील संबंधित पोलीस अधिकारी जिल्हा प्रशासन यांनी कोणती चौकशी करून सदरच्या गाड्या सोडल्या अशा अनेक शंका सातारा शहर व नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाले असून याची सखोल चौकशी व्हावी यासाठी सातारा विकास आघाडीने गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले आहे यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम आरोग्य सभापती अनिता घोरपडे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर व ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय बनकर उपस्थित होते

या सर्व प्रश्नांची सखोल चौकशी करावी व सत्य जनतेसमोर आणावे तसेच जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे अशी आग्रही मागणी खा श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सातारा नगरपरिषद देतील सत्ता रुड सातारा विकास आघाडीने केली असून या बाबी मधील करोना च्या पार्श्वभूमीवर गांभीर्य लक्षात घेऊन आपण तातडीने चौकशी करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सातारकर नागरिकांच्या वतीने सातारा विकास आघाडीने यावेळी निवेदनाद्वारे केली आहे
संबंधित निवेदनाची प्रत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ,उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ,आरोग्यमंत्री राजेश टोपे ,पालकमंत्री बाळासाहेब पाटील, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस ,विभागीय आयुक्त पुणे विभाग पुणे जिल्हाधिकारी , जिल्हाधिकारी सातारा, आयुक्त महानगरपालिका पुणे ,माननीय पोलीस अधीक्षक सातारा जिल्हा यांनाही निवेदनाची सदरची प्रत पाठवण्यात आली आहे

Adv