जिल्ह्यातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी शासनाने माफ करावी उदयनराजें

235
Adv

कोरोना या संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभूमीवर दिनांक 22 मार्च पासून समाजातील सर्वच घटकांची अत्यंत कठीण परिस्थिती झाली आहे मंडई ,रिक्षा, पान शॉप ,जनरल स्टोअर्स छोटे उद्योग धंदे करणारे स्वयंरोजगार वाले कामगार वर्ग आधी सर्वांचे आपापले रोजीरोटीचे व्यवसाय एकतर पूर्णपणे बंद आहेत किंवा शासनाने दिलेल्या सवलती च्या वेळेस रडतखडत सुरू आहेत अत्यंत बिकट आणि प्रतिकूल परिस्थितीचा सामना प्रत्येक सातारकर नागरिकांना करावा लागत आहे अशा कठीण परिस्थितीत सातारा जिल्ह्यातील सर्व नगरपरिषदा आणि नगरपंचायती मधील नागरिकांच्या मिळकतीची सण 2020 21 या आर्थिक वर्षातील घरपट्टी पाणीपट्टीची रक्कम माफ करणे बाबत राज्य शासनाने निर्णय घेतला पाहिजे शासनाने असा निर्णय घेण्यासाठी जिल्ह्यातील सर्व नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांनी सर्वसाधारण सभेमध्ये ठराव मंजूर करून नागरिकांच्या हिताचा निर्णय घेण्याबाबत राज्य शासनास शिफारस करावी अशा सूचना सातारा विकास आघाडीचे अध्यक्ष खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी आज जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत च्या संबंधित पदाधिकाऱ्यांना दिल्या

कोरोना ने जगभर थैमान घातले आहे अनेक देशाचे कंबरडे मोडले असतानाही सामान्य माणूस जगला पाहिजे अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत राज्य शासन देखील कृषी विषयक तसेच वीज बिलाबाबत नागरिकांना सवलत देण्यात अनेक उपाय योजत आहेत त्याच धर्तीवर सातारा जिल्ह्यातील नागरिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीमधील मिळकत धारांचा धारकांची या वर्षाची मिळकत कराची घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याबाबत निर्णय घ्यावा नागरिकांना दिलासा द्यावा अशी आमची ठाम भूमिका आहे ज्यावेळी दैनंदिन गरजा भागवणे सातारकर नागरिक धडपडत आहेत त्यावेळी त्यांच्यावर घरपट्टी व पाणीपट्टी चा बोजा न टाकता नागरिकांच्या जगण्याला माणुसकीच्या भावनेतून शासनाने बळ दिले पाहिजे अशी आमची मनापासूनची इच्छा असल्याचेही ही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सांगितले

सातारकर नागरिक अडचण असताना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच प्रथम प्राधान्य दिले आहे म्हणूनच सण 20/21 या आर्थिक वर्षातील नागरी हद्दीतील सर्व नागरिकांची घरपट्टी आणि पाणीपट्टी ची रक्कम राज्य शासनाने माफ करणे आम्हाला गरजेचे वाटते किंबहुना अशा संसर्गजन्य रोगाच्या कठीण परिस्थितीत महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हद्दीतील घरपट्टी आणि पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय शासनाने प्राधान्याने घेणे आवश्यक आहे अशा शब्दात भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी पदाधिकाऱ्यांना सूचना देताना आपल्या भावना व्यक्त केल्या

Adv