सातारा नगर परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह विभाग प्रमुख असलेल्या अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत आज खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी नगरपरिषदेच्या विविध कामांच्या सद्यस्थितीचा आढावा घेऊन अधिकाऱ्यांनी जनसामान्यांना केंद्रबिंदू मानून काम करावे गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोरोनाशी लढा देत असताना विकासकामांच्या वर जरी मर्यादा आल्या असल्या तरीसुद्धा येणाऱ्या काळात योग्य नियोजन करून लोकहिताची कामे मार्गी लावणे बाबत सर्व अधिकाऱ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडावी असा मार्गदर्शकनात्मक सल्ला यावेळी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिला
यावेळी महत्वाच्या विकास कामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचा निर्णय घेऊन संबंधितांना बरोबर युनियन क्लब यादवगोपाळ पेठ बगीच्या जुन्या नगरपालिकेच्या इमारतीमध्ये होणाऱ्या आर्ट गॅलरी सदाशिव पेठ भाजी मंडई करंजे येथील होणारी पाण्याची टाकी आणि नवीन शाळा माजगावकर माळ घरकुल योजना हुतात्मा स्मारक इत्यादी ठिकाणी च्या कामांची जागेवर जाऊन पाहणी केली युनियन क्लब चे पाठीमागील बाजूस नगरपरिषदेची 57 गुंठे मोकळी जागा आहे सदर जागेचा चांगला विनियोग करताना युनियन क्लब शी बोलणी करून चांगले नियोजन करता येईल या मोकळ्या जागेत युनियन क्लब ची जुनी इमारत ही नव्याने बांधून चांगली वस्तु या ठिकाणी निर्माण करता येईल असे मतही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी यावेळी व्यक्त केली
यावेळी नगराध्यक्ष माधवी कदम उपनगराध्यक्ष किशोर शिंदे ज्येष्ठ नगरसेवक दत्तात्रय बनकर मनोज शेंडे सभापती यशोधन नारकर अनिता घोरपडे ज्ञानेश्वर फरांदे सुजाता राजेमहाडिक स्मिता घोडके इतर नगरसेवक व अधिकारी वर्ग उपस्थित होता