भाजपचे साताऱ्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वतीने शुक्रवारी जल मंदिर येथे गरजू व्यक्ती व कुटुंबांना चाळीस पोती धान्य वाटप करण्यात आले . दुपारी तीनच्या दरम्यान राजेंच्या हस्ते वाटप कार्यक्रम करण्यात आला .
उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने आयोजित धान्य वाटप कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंग कसे राहिल याची काळजी घेण्यात आली होती . साताऱ्यात गेल्या दीड महिन्यापासून लॉक डाऊन सुरू आहे . त्यामुळे सर्वसामान्य नागरीक, हातावर पोट असणारे छोटे मोठे विक्रेते, पारधी जमातीचे लोक, परप्रांतीय कामगार, व दारिद्रय रेषेखालील कुटुंबे यांची जीवनावश्यक वस्तू व रेशनिंग अभावी प्रचंड परवड सुरू आहे
. पोटाला पुरेसे अन्न नसल्यामुळे या गरजू कुटुंबांना हलाखीचे दिवस काढावे लागत आहे . याची माहिती खासदार उदयनराजे भोसले यांना समजल्यावर उदयनराजे यांनी सातारा व जावली तालुक्यातील शेतकऱ्यांशी संपर्क करून मुबलक धान्यसाठा उपलब्ध केला . दररोज दहा कुटुंबांना सोशल डिस्टन्सिंग राखून पाच किलो तीन किलो या प्रमाणात गहू व तांदूळ याचे वाटप केले जात आहे . शुक्रवारी स्वतः उदयनराजे यांच्या हस्ते साताऱ्यातील कातकरी व दारिद्रय रेषेखालील कुटुंबे, छोटे मोठे विक्रेते, पारधी समाज विशेष मध्ये ठोसेघर येथील काही कुटुंब या अडचणीतील व्यक्तींना स्वतःहून उदयनराजे भोसले यांनी मदतीचा हात दिला . यावेळी माजी शिक्षण सभापती सुनील काटकर व बाळासाहेब ढेकणे, जितेंद्र खानविलकर, इ कार्यकर्ते उपस्थित होते . दिवसभरात मित्र समूहाच्या वतीने तीस पोती धान्यं वितरित करण्यात आल्याचे सांगण्यात आले .