पुणे, पिंपरी. चिं च्या गाड्यांंना खेड-शिवापूर टोल नाक्यावर टोलमाफ,

37
Adv

टोलनाका हटाव कृती समितीकडून हे आंदोलन आयोजित केले गेले होते. हातात काळे झेंडे आणि फलक घेऊन सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ या आंदोलनात उतरले होते. यामुळे रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. या आंदोलनावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. “जय जय रामकृष्ण हरी’ नामाचा जयघोष करत आंदोलकांनी हे वेगळ्या पद्धतीने हे आंदोलन केले. खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

या आंदोलनाला प्राथमिक यश मिळाले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील गाड्यांना पुढील ८ दिवसांसाठी टोलमाफी देण्यात आली आहे. पूर्णतः टोलनाका हटवण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे आणि कृती समितीतील आमदार सदस्य केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार आहेत. टोलमाफी असणाऱ्या गाड्यांसाठी येताना आणि जाताना टोलनाक्यावर वेगळे लेन असणार आहेत. पुढील आंदोलनाची दिशा नितीन गडकरी यांच्याशी भेट झाल्यानंतर ठरवली जाईल

टोलनाका हटाव कृती समितीने खेड-शिवापूर हद्दीतील टोलनाका पुण्याच्या हद्दीतून बाहेर काढावा अशी मुख्य मागणी केली होती. या टोलनाक्यावर होणारी आर्थिक लूट आणि वाहतूक कोंडी यामुळे भोर आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांचा आक्रोश वाढत होता.

Adv