पालिकेचे आरोग्य सभापती विशाल जाधव यांच्या संकल्पनेतून कास स्वच्छता मोहीम आयोजित केली होती याचे सर्व नियोजन सभापती विशाल जाधव यांनी केले होते सर्व नगरसेवक यांना निरोप देऊनही सातारा विकास आघाडी, नगरविकास आघाडी व भाजपचे नगरसेवक यांनी सभापतींच्या हाकेला पाठ दाखवल्याचे दिसले
पालिकेचे विद्यमान आरोग्य सभापती विशाल जाधव काही न काही कारणांसाठी तीन वर्षात बरेच चर्चेत आलेले आहेत विशेष करून आरोग्य कर्मचाऱ्यांचे बाबतीतच चांगलेच चर्चेत होते आता तर त्यांनी कास स्वच्छता मोहीम संकल्पना राबवली ती कौतुकास्पद आहे परंतु त्यांच्या मोहिमेला नगरविकास आघाडीचे स्वीकृत नगरसेवक अविनाश कदम वगळता अन्य नगरसेवकांनी का पाठ फिरवली हा खरा प्रश्न उपस्थित होत आहे
आरोग्य सभापती यांच्या हाकेला कोणत्याही नगरसेवकांनी प्रतिसाद दिला नाही याचे गौडबंगाल काय का स्वतःच्या आघाडी त त्यांच्या दोन गट निर्माण झालेत का अशी चर्चा खाजगीत रंगू लागली आहे