सातारा जिल्ह्यातील अकरा पंचायत समित्यांच्या आरक्षणाची सोडत सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजनात पार पडली. यामध्ये फलटण, खंडाळा आणि कोरेगाव तालुका पंचायत समित्या सर्वसाधारण खुला गटासाठी तर महाबळेश्वर, माण, खटाव आणि सातारा या पंचायत समित्यांमध्ये सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत निघाली.
गेल्या काही दिवसांपासून तालुका पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडतीचे पंचायत समिती सदस्यांना वेध लागले होते. 21 डिसेंबरपासून 2019 पासून अडिच वर्षांकरिता सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात प्रभारी जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी फलटण, खंडाळा आणि कोरेगाव पंचायत समित्या सर्वसाधारण साठी खुल्या झाल्याने पदासाठी रस्सीखेच सुरू राहणार आहे. त्याचप्रमाणे सातारा पंचायत समितीत सर्वसाधारण महिला प्रवर्गाला सभापती पद मिळणार आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वर आणि माण व खटावमध्येही महिला सर्वसाधारण प्रवर्गातील सदस्या सभापती होणार आहे.
कराड पंचायत अनुसुचित जातीसाठी तर वाई आणि जावली नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी आरक्षित झाले आहे. पाटण पंचायत समिती नागरिकांचा मागास प्रवर्गमधून सभापती निवडला जाणार आहे.
आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर संबंधित प्रवर्गातील सदस्यांनी सभापती पदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.