महाराष्ट्रात कोकण विभागात अरबी समुद्र किनाऱ्यावर 1 जून ते 4 जून कालावधीत निसर्ग चक्रीवादळ धडकणार असल्याबाबत हवामान खात्याने इशारा दिल्याने सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन जिल्ह्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे
संभाव्य ‘निसर्ग’ या वादळाचा परिणाम सातारा जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही, यामुळे संभाव्य अतिवृष्टी, वादळ-वारे होऊन झाडांची मोठ्या प्रमाणात पडझड होणे, विद्यूत खांब, तारांचे नुकसान होणे, वीज पूरवठा खंडीत होणे, संपर्क यंत्रणा खंडीत होणे, वाऱ्यांमुळे घर पडझड किंवा इतर बाबींचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाच्या सुचनांचे पालन करावे असे आवाहन भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी जिल्ह्यातील नागरिकांना केले आहे
या गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
1. सगळी इलेक्ट्रीक उपकरणं व गॅस बंद ठेवा.
2. दारं, खिडक्या बंद ठेवा.
3. तुमची महत्वाची कागदपत्रं वॉटरप्रुफ करून ठेवा.
4. मोबाईल चार्ज करुन ठेवा, एसएमएसचा वापर करा.
5. घर असुरक्षित असेल तर सुरक्षित ठिकाण गाठा.
6. विद्युत तार, खांब यापासून दूर राहा.
7. जनावरं, प्राण्यांना बांधून न ठेवता मोकळं सोडा.
8. माहितीसाठी न्यूज चॅनल, रेडिओ ऐकत राहा.
9. कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका.
10. फक्त प्रशासनाच्या सूचना वेळेच्या वेळेला लक्षात असू द्या.