पाणीपुरवठा विभागातील गुडगुडी बाबा हा भलत्याच नशेत असतो बहुतेक पाणी कमी आणि नशा जास्त असल्याने तो पाणीपुरवठा विभागात हा गुडगुडी बाबा इतके वर्षे काम करत असल्याचे दिसून येते
पालिकेच्या प्रत्येक विभागात गुडगुडी बाबा पाहायला मिळतात सातारा पालिकेत कोणाचीही सत्ता असो पाणीपुरवठा सभापती कोणीही असो पण तिथे मात्र एक गुडगुडी बाबा हा त्या सभापतींच्या मागे चिकटलेला असतो आता तर खुद्द सभापती पाणीपुरवठा विभागातील गुडगुडी बाबाच्या घरापासून हाकेच्या अंतरावर राहतात त्यामुळे हा गुडगुडीबाबा पाणी कमी आणि नशा जास्त यातच गुंग असतो
पाणीपुरवठा विभागातील या गुडगुड बाबाच्या रंगली कहाण्या सातारा शहरात बरयाच चर्चेत आहेत बऱ्याच मित्रांना पालिकेच्या जागेत अतिक्रमण करण्यात ही या गुडगुडी बाबाचा हातभार आहे उदाहरणार्थ मोतीतळया शेजारील त्याच्या मित्राने केलेले पार्किंगमधील अतिक्रमण म्हणा ना. पार्किंग मध्ये अतिक्रमण केले की याचा स्वाद आणि आस्वाद हा भागलेला असतो त्यामुळे पाणीपुरवठा सभापती महोदय तुमच्या विभागातील या गुडगुडी बाबाला आवरा अन्यथा याचेही वस्त्रहरण व दूध का दूध पानी का पानी केल्याशिवाय सातारानामा गप्प बसणार नाही हे नक्की