नेचर इन नीड ला पालिकेची नोटीस कोकणच्या कचरा प्रकरणाचा मागविला खुलासा

55
Adv

सोनगाव कचरा डेपोवर आता थेट कोकण प्रांताचा कचरा येऊन पडल्याच्या चर्चेने कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या नेचर इन नीड चा परस्पर कारभार चव्हाट्यावर आला आहे . पालिकेच्या आरोग्,य विभागाने संबधित संस्थेला या प्रकरणी नोटीस बजावून तातडीने खुलासा मागितला आहे .

सातारा पालिकेच्या मालकीचा सोनगाव कचरा डेपो पावणे सात एकरामध्ये पसरला असून कडक नियंत्रणाअभावी या डेपोवर कोणीही यावे कचरा टाकून जावे अशी परिस्थिती आहे . पुणे महापालिकेचा जैववैद्यकीय कचरा टाकणाऱ्या पास्को कंपनीचा कोणताही खुलासा नगरपालिकेने घेतला नाही उलट त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाची परवानगी आणल्याचा खुलासा तत्कालीन मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी करत वेळ मारून नेली . आता शुक्रवारी पुन्हा कोकण विभागातला जैववैद्यकीय कचरा साताऱ्याच्या सोनगाव डेपोवर आल्याची चर्चा पुन्हा सुरू झाल्याने नेचर इन नीड चे परस्पर कारभार सुरू झाल्याची ओरड सुरू झाली . एका राजकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्याने स्टींग ऑपरेशन करुन ही बाब उघडकीस आणली . त्यानंतर करोनाच्या कामात व्यस्त असणारा आरोग्य विभाग जागा झाला . नक्की काय घडले याची माहिती घेण्यासाठी नेचर इन नीड ला पालिकेने नोटीस बजावली आहे . प्राप्त माहितीनुसार कोकणातील कोणत्या तरी पालिकेचा कचरा नेचर च्या गाडीत टाकण्यात आला , मात्र हा कचरा घेण्यासाठी गाडी कशी तिकडे गेली हा प्रश्न उपस्थित झाला आहे . सोनगाव डेपोची मालकी सातारा पालिकेची आहे मग त्यांना कल्पना न देता नेचर इन नीड परस्पर दुसऱ्या पालिकेचा कचरा कसा आणू शकते असा प्रश्न सत्ताधारी नगरसेवकांनी उपस्थित केले आहेत .नेचर इन नीडचे संचालक सागर जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत .

Adv