मनोज कलापट यांची भाजपाच्या सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

97
Adv

पिंपोडे बुद्रुक,दि,१६ :-
वाठार स्टेशन ता.कोरेगाव येथील भाजपचे कट्टर व निष्ठावंत कार्यकर्ते मनोज कलापट हे गेली २० वर्ष अखंड कार्य करत आले आहेत. त्यांना राजकारणापेक्षा समाजसेवेची आवड असल्यामुळे त्यांनी १९९१ सालापासून विश्व हिंदू परिषदेतून आपल्या कामाची सुरवात केली. सन २००० मध्ये विद्यमान केंद्रीयमंत्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यावेळी पदवीधर मतदार संघातून सध्याचे विद्यमान केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांना निवडून आणण्यात मनोज कलापट यांचा सिंहाचा वाटा आहे. याची दखल पक्ष श्रेष्ठीनी वेळोवेळी घेतली. व त्यांना कोरेगाव तालुक्याचे युवा मोर्चा अध्यक्ष, तालुका कार्यकारणी उपाध्यक्ष, तालुका सरचिटणीस,जिल्हा चिटणीस अशा विविध पदावर काम करण्याची संधी दिली.विद्यमान जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी जिल्हाअध्यक्ष भरत पाटील, डॉ.गजाभाऊ कुलकर्णी, भिकू भोसले,अविनाश फरांदे यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली पदाच्या माध्यमातून जनतेची कायम सेवा केली

, पक्षाने दिलेल्या संधीचा फायदा त्यांनी जनहितासाठी केला. ते नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असतात. तालुक्यात तसेच जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाची संघटना बळकट करण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. तळागळापर्यंत कार्यकर्त्यांची फळी तयार केली. तसेच वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटात उमेदवार देऊन भाजपाचे कमळ त्यांनी घराघरात पोचविले.त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने त्यांची सातारा जिल्हा उपाध्यक्ष पद देऊन पक्षमजबूत करण्यासाठी संधी दिली आहे. समाज कार्यात गावातील भाजपा पदाधिकारी,कार्यकर्ते,मित्र मंडळी यांचे कायम सहकार्य लाभले आहे.जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांचे कायम पाठबळ लाभले असून जिल्हाध्यक्षाच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटनासाठी नेहमी प्रयत्नशील राहणार आहे. या जिल्हा निवडी मध्ये जिल्हा कार्यकारिणीच्या सदस्यपदी चित्रा जाधव यांना सुध्दा काम करण्याची संधी मिळाली आहे.या निवडीसाठी ना.चंद्रकांत दादा पाटील, खा.उदयनराजे भोसले, खा.रणजीत दादा निंबाळकर,पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री रवी अनासपुरे, आमदार शिवेंद्रराजे भोसले, आमदार जयकुमार गोरे,अतुल भोसले, मदनदादा भोसले, शेखर चरेगावकर,जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, तसेच फलटण -कोरेगाव तालुका व वाठारचे स्थानिक सर्व भाजप पदाधिकारी, ग्रामस्थ,यांनी पुढील वाटचालीस मनोज कलापट यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Adv